Sarkari Yojana Information : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शेतकऱ्यांसाठी (farmer) आर्थिक मदत म्ह्णून वार्षिक ६ हजार रुपये देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) ही महत्त्वाची योजना राबवली आहे.
या योजनेमध्ये वेळेनुसार नवनवीन बदल करण्यात आले असून याआधी या योजेनचा १० वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात (bank Account) पाठवण्यात आला आहे. तसेच सरकार लवकरच २००० रुपयांचा ११ वा हप्ता हस्तांतरित करणार आहे. सरकारने या सेवेत बदल केले आहेत. आता आधार OTP द्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे.
ई-केवायसी (E-KYC) करण्याच्या पद्धतीत बदल
किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर आधार ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा रद्द करण्यात आली आहे. आता तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी इतर पद्धती वापराव्या लागतील.
याचा फटका या शेतकऱ्यांना बसणार आहे
सरकारच्या या बदलाचा परिणाम अशा शेतकऱ्यांवर होणार आहे ज्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही कारण सरकारने ओटीपीद्वारे ई-केवायसी करण्याची सेवा निलंबित केली आहे.
तथापि, ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही, ते आता जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड सोबत ठेवावे लागेल. तरच ते शेतकरी ११ व्या हप्त्याचा लाभ घेऊ शकतील.
दहाव्या हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत
काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दहाव्या हप्त्याचे पैसे पोहोचलेच नाहीत. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केले नसल्याचे समोर आले. अलीकडेच, सरकारने ई-केवायसी करणे अनिवार्य केले आहे.
सरकारने ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत दोनदा वाढवली आहे. आता शेतकऱ्यांना ३१ मे पर्यंत ई-केवायसी करावे लागेल, त्यानंतरच पुढील हप्ता त्यांच्या बँक खात्यात येईल.