ताज्या बातम्या

Sarkari Yojana Information : शेतकऱ्यांसाठी सरकारची खास योजना; शेतात झाडे लावा आणि दरवर्षी मिळवा पैसे

Sarkari Yojana Information : भारतामध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. शेतकऱ्यांसाठी (Farmers) केंद्र असो वा राज्य सरकार (State Goverment) सतत काही ना काही योजना आणत असतात. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होत असतो.

अशाच एका सरकारी योजनेविषयी (Government scheme) आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. भारतात जवळपास 55 ते 60 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना सुरू करत असतात.

अशी एक योजना आहे. सरकार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात झाडे लावण्यासाठी (Planting trees) दरवर्षी 10 हजार रुपये देते. छत्तीसगड सरकारने 6 जून 2021 रोजी मुख्यमंत्री वृक्षारोपण प्रोत्साहन योजना सुरू केली होती.

याअंतर्गत पर्यावरणाचे रक्षण आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट नफा तर मिळेलच, शिवाय पंचायत आणि वन समित्यांचे उत्पन्नही वाढेल, असा सरकारचा विश्वास आहे.

योजनेचे उद्दिष्ट

शेतकऱ्यांचे खाजगी क्षेत्र, वनहक्क धारकाची जमीन, सरकारी विभागांची महसुली जमीन, संयुक्त वन व्यवस्थापन समिती आणि ग्रामपंचायती, वृक्षारोपणासाठी देणे आहे.

पर्यावरणात सुधारणा करून हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करणे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ करणे. खाजगी आणि सामुदायिक जमिनींवर वृक्षारोपण करून जंगलांचे संरक्षण करणे.

पूर, दुष्काळ इत्यादींवर नियंत्रण ठेवणे आणि वृक्षारोपणाला प्रोत्साहन देऊन जमिनीची पाणी पातळी वाढवणे. उद्योगांसाठी लाकडाची गरज पूर्ण करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, जी.डी.पी. वाढवणे.

योजनेसाठी पात्र

या योजनेसाठी ते सर्व शेतकरी पात्र आहेत, जे भातशेती करून सरकारला धान विकत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर खरीप पिकांऐवजी लागवड करायची आहे किंवा वन हक्क प्रमाणपत्र धारक,

ज्यांना त्यांच्या जमिनीवर नव्याने झाडे लावायची आहेत, तेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासोबतच ग्रामपंचायत आणि संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांनाही या योजनेचा लाभ घेता येईल.

अर्ज कसा करायचा?

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे सर्व इच्छुक शेतकरी बांधव एकात्मिक शेतकरी पोर्टलला भेट देऊन अर्ज करू शकतात. याशिवाय शेतकरी पोर्टलच्या मुख्यमंत्री वृक्षारोपण प्रोत्साहन योजना असलेल्या बॉक्सवर क्लिक करून शेतकरी अधिक माहिती मिळवू शकतात.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts