ताज्या बातम्या

Sarkari Yojana Information : २ मुली असणाऱ्या पालकांसाठी सरकार देत आहे इतके हजार रुपये, असा घ्या या योजनेचा लाभ

Sarkari Yojana Information : मोदी सरकारकडून (Modi Goverment) देशातील महिला आणि मुलींसाठी (Women and girls) विविध योजना राबवल्या जात आहेत. भारत सरकारकडून (India Goverment) राबवल्या जात असलेल्या योजनांचा लाखों महिला आणि मुलींना फायदा होत आहे. आता भारत सरकाराने ज्या पाल्यांना २ मुली आहेत अशा पालकांसाठी नवी योजना आणली आहे.

ज्यामध्ये मुलींचे जीवन यशस्वी करण्यासाठी लहानपणापासूनच गुंतवणूक सुरू होते. मात्र, केंद्राव्यतिरिक्त अनेक राज्य सरकारेही त्यांच्या स्तरावरून मुलींसाठी अशा योजना राबवत आहेत. अशीच एक योजना हरियाणा सरकारची आहे, ज्यामध्ये मुलींना आर्थिक मदत करण्यासाठी दरवर्षी 5000 रुपये दिले जात आहेत.

हरियाणा लाडली (Haryana Ladali) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा लाभ फक्त तेच लोक घेऊ शकतील, ज्यांच्या घरात 2 मुली आहेत. तसेच, 20 ऑगस्ट 2005 नंतर ज्या मुलीचा जन्म झाला असेल, ते कुटुंब या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असेल.

पैसे कसे मिळवायचे?

हरियाणा सरकार ‘किसान विकास पत्र’च्या माध्यमातून या योजनेअंतर्गत आर्थिक मदत करणार आहे. म्हणजेच, तुमची मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला वार्षिक 5000 रुपये दिले जातील.

काय आवश्यक असेल

लाभार्थ्याला आधार कार्ड, बीपीएल शिधापत्रिका, मोबाईल क्रमांक, जन्म प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, पालकांचा पासपोर्ट आकाराचा फोटो, पालकांचे ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक असेल.

अर्ज कसा करायचा?

ज्यांना दोन मुली आहेत, ते त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, शासकीय रुग्णालयात जाऊन अर्ज करू शकतात. तुम्ही महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडूनही मदत घेऊ शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts