Saving Scheme : बचतीसाठी सध्या बाजारात एकापेक्षा एक योजना आहेत, अशातच पोस्ट ऑफिसकडून देखील उत्तम योजना ऑफर केल्या जातात, ज्या ग्राहकांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देतात. पोस्ट ऑफिस आपल्या सर्व ग्राहकांना एकापेक्षा एक योजना ऑफर करते, जिथे तुम्ही अगदी 50 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता.
होय, अगदी छोट्या गुंतवणुकीपासून मोठ्या गुंतवणूकीपर्यंत येथे गुंतवणूक करता येथे, पोस्ट ऑफिस योजनांची खास गोष्ट म्हणजे येथील पैशांची हमी सरकार घेते, म्हणूनच येथील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.
सरकार पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून अनेक योजना राबवत आहे. ज्यामध्ये छोट्या बचतीतून मोठा निधी तयार केला जाऊ शकतो. पोस्ट ऑफिस योजना केवळ चांगल्या परताव्यासाठी प्रसिद्ध नाहीत तर सुरक्षित गुंतवणुकीचा एक उत्तम मार्ग देखील आहेत. ग्राम सुरक्षा योजना ही अशाच विशेष योजनांपैकी एक आहे. या योजनेद्वारे दररोज 50 रुपयांची बचत करून 35 लाख रुपयांचा निधी तयार केला जाऊ शकतो. जेणेकरून मुलाचे शिक्षण, लग्न आणि इतर महत्त्वाच्या कामात मदत करता येईल.
19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही भारतीय व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. किमान गुंतवणूक मर्यादा 10 रुपये आहे. जास्तीत जास्त 10 लाख रुपयांची गुंतवणूक करता येईल. ही योजना ३ वर्षांनंतरही सरेंडर करता येते. वयाची 80 वर्षे पूर्ण केल्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा मिळतो. दरम्यान गुंतवणुकदाराचा मृत्यू झाल्यास, वारसाला रक्कम मिळते. मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक प्रीमियम भरण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. योजना हमी बोनससह येते.
गुंतवणूकदाराने वयाच्या 19 व्या वर्षी 10 लाख रुपयांची योजना घेतल्यास, त्याला 55 वर्षांसाठी 1515 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल. याचा अर्थ गुंतवणूकदारांना दररोज 50 रुपये वाचवावे लागतील. तर 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये प्रीमियम भरावा लागेल. 60 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास 34.60 लाख रुपयांचा निधी तयार होईल.