Savings Schemes : ‘या’ ठिकाणी करा गुंतवणूक! मिळेल FD पेक्षा अधिक परतावा, जाणून घ्या संपूर्ण योजना

Savings Schemes : अनेकजण आपल्या चांगल्या भविष्यासाठी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. तुम्हीही तुमच्या आवडीनुसार गुंतवणूक करू शकता. इतकेच नाही तर अनेकजण सर्वात जास्त परतावा आणि कोणतीही जोखीम नसणाऱ्या योजनेत गुंतवणूक करतात.

जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल आणि तुम्हला कोणत्या योजनेत गुंतवणूक करावी हे समजत नसेल तर बातमी तुमच्या कामाची आहे. सध्या काही योजना आहेत ज्या आपल्या गुंतवणूकदारांना FD पेक्षा अधिक परतावा देत आहेत. जाणून घ्या संपूर्ण योजना.

SSC योजना

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन कर प्रणाली लागू करण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा केलेली होती. या योजनेअंतर्गत वृद्धांसाठीची रक्कम 15 लाखांवरून 30 लाख रुपये केली आहे. त्यामुळे वृद्धांना पूर्वीपेक्षा जास्त पटीने परतावा मिळत आहे. सध्या या योजनेत ८.२ टक्के दराने व्याज दिले जात आहे. तसेच अर्थमंत्र्यांनी गुंतवणुकीची मर्यादा 30 लाख रुपयांपर्यंत वाढवली असून तुम्हाला 8.2 टक्के व्याजदराने 5 वर्षांच्या मॅच्युरिटीवर 12.30 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजासह 42.30 लाख रुपये दिले जातील.

पोस्ट ऑफिस वेळ ठेव योजना

या योजनेत 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. यात कमीत कमी 1000 रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. तर यात जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नसते. या योजनेवर गुंतवणूकदारांना साधे व्याज मिळत असून या योजनेत 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीदरम्यान 1 वर्षासाठी 6.90 टक्के आणि 2, 3 आणि 5 वर्षांच्या गुंतवणुकीवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

आरबीआय फ्लोटिंग रेट सेव्हिंग बाँड

RBI फ्लोटिंग रेट सेव्हिंग बॉन्डबद्दल सांगायचे झाले तर, त्याचा व्याजदर NSC योजनेशी जोडण्यात आला आहे. त्याचा व्याजदर NSC च्या व्याजदरापेक्षा 0.35 टक्क्यांनी जास्त आहे. तर NSC व्याजदरातील कोणताही बदल RBI बचत रोख्यांवर ऑफर करण्यात आलेल्या व्याजदरात पाहायला मिळेल.

सध्या NSC मध्ये 0.35 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. RBI बचत रोख्यावरील व्याजदर 8.05 टक्के झाला आहे. या रोख्यांमध्ये कमीत कमी गुंतवणूक 1,000 रुपयांपासून सुरू होते आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र

पोस्ट ऑफिसच्या या विशेष योजनेमध्ये तुम्हाला कमीत कमी 100 रुपये गुंतवता येतील. याचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा असून यात गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली नाही. तसेच या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी ७.७ टक्के दराने वार्षिक व्याज देण्यात येत आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts