SBI Hikes Interest Rate: RBI ने वाढविलेल्या रेपो रेटचा (repo rate) परिणाम आता दिसू लागला आहे. अनेक बँकांनी व्याजदरात (interest rate) वाढ केली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) देखील कर्जदरात 50 bps ने वाढ केली आहे. या वाढीमुळे गृहकर्ज (Home loan) घेणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
गृहकर्ज महागणार
RBI च्या रेपो दरात वाढ केल्यानंतर SBI ने देखील व्याजदरात 50 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय (EMI) भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे आरबीआयच्या वाढीनंतर बँकांसह आणखी अनेक वित्तीय संस्था व्याजदर वाढवू शकतात, असे अनेक तज्ज्ञांचे मत होते.
आरबीआयने शुक्रवारी रेपो दरात वाढ केली होती
शुक्रवारी भारतीय रिझर्व्ह बँकेने चौथ्यांदा व्याजदर वाढवला होता. या वाढीनंतर रेपो दर 5.90 टक्के झाला आहे. एसबीआयने (SBI) आपल्या अधिकृत वेबसाइटवरही ही माहिती दिली आहे. या वाढीनंतर स्टेट बँकेचा EBLR 8.55 टक्क्यांवर गेला आहे. त्याच वेळी, RLLR 8.15 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ही वाढ शनिवारपासून लागू झाली आहे.
आणखी दोन बँकांनी व्याजदरात वाढ केली
त्याच वेळी, रेपो दरात वाढ केल्यानंतर, खाजगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसीने देखील कर्जदरात वाढ केली आहे. HDFC बँकेने व्याजदरात 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी EMI वाढेल. HDFC बँकेने पाच महिन्यांत सातव्यांदा यात वाढ केली आहे. त्याच वेळी, बँक ऑफ इंडियाने RBLR 8.75 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.