ताज्या बातम्या

SBI Latest News: 44 कोटी ग्राहकांसाठी मोठी बातमी; SBI अकाउंट होणार बंद ! जाणून घ्या नेमकं प्रकरण

SBI Latest News: तुम्ही देखील देशाची सर्वात मोठी बँक SBI चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये SBI चा YONO APP असेल तर हे अकाउंट आता बंद होणार असल्याचा मॅसेज मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मेसेजमध्ये असं सांगण्यात येत आहे कि तुम्ही पॅन नंबर अपडेट न केल्यास तुमचे SBI YONO खाते बंद होणार आहे. या व्हायरल मेसेजमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की, जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक अपडेट केला नसेल तर तुमचे YONO खाते बंद केले जाईल. इतकेच नाही तर यासोबत या मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली आहे, ज्यामध्ये अपडेट करण्याचे सांगण्यात आले आहे.

या मेसेजचे सत्य काय आहे?

पीआयबीच्या तथ्य तपासणी पथकाने या मेसेजची सत्यता तपासली. पीआयबी फॅक्ट चेकने याची चौकशी केली आहे आणि ते आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केले आहे आणि म्हटले आहे की एसबीआयच्या नावाने जारी केलेला बनावट मेसेज ग्राहकांना त्यांचे खाते बंद होऊ नये म्हणून त्यांचा पॅन क्रमांक अपडेट करण्यास सांगत आहे.

म्हणजेच हा व्हायरल मेसेज पूर्णपणे फेक आहे. पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, ‘ईमेल आणि एसएमएसला उत्तर देऊ नका आणि चुकूनही तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक तपशील कोणाला शेअर करू नका .’

SBI

बँकही अलर्ट जारी करते

हे लक्षात घेण्यासारखे आहे की SBI आपल्या ग्राहकांना वेळोवेळी सतर्क करत असते. ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी सल्ला देणारे मेसेजही बँकेकडून वेळोवेळी पाठवले जातात. एसबीआयने आपल्या ग्राहकांना बनावट व्हायरल मेसेजबद्दल सतर्क केले आहे आणि सांगितले आहे की एसबीआय कधीही कोणत्याही मेसेजद्वारे वैयक्तिक तपशील विचारत नाही.

हे पण वाचा :- Lottery Ticket : बाबो .. लॉटरी खेळली अन् जिंकले तब्बल 16 हजार कोटी रुपये! मात्र तरीही ..

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts