SBI’s big action: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. SBI ने त्यांच्या ग्राहकांची खाती फ्रीज (Freeze customer accounts) केली आहेत ज्यांनी त्यांचे KYC 1 जुलैपर्यंत अपडेट केले नाही.
पगारदारांचे पगार खात्यात जमा होत असताना बँकेने ही कारवाई केली आहे. बँकेच्या या कारवाईमुळे ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांना त्यांची खाती चालवता येत नाहीत.
बँक अधिकाऱ्याचा दावा –
‘बिझनेस लाइन’च्या रिपोर्टनुसार, बँकेने याबाबत माहिती दिली नाही, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. आता ग्राहकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. त्याच वेळी, एसबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दावा केला की, एक अधिसूचना जारी करण्यात आली होती आणि ग्राहकांना वैयक्तिक पत्र पाठवण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांना केवायसी आगाऊ अपडेट (KYC advance update) करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
पोर्टलवर माहिती नाही –
तसेच एसबीआयच्या लॉगिन पोर्टलवर केवायसी अपडेटबाबत अशी कोणतीही माहिती दिसली नाही. एटीएम (ATM) किंवा ऑनलाइन व्यवहार करण्याचा प्रयत्न करतानाच ग्राहकांना याबाबत माहिती मिळते. SBI ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून तिचे देशभरात सुमारे 45 कोटी ग्राहक आहेत.
RBI सल्ला –
ऑनलाइन फसवणुकीचा वाढता धोका लक्षात घेता, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) देशातील सर्व बँकांना KYC नियमितपणे अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. पूर्वी बँका ग्राहकांना 10 वर्षांतून एकदा KYC अपडेट करण्यास सांगत असत. पण आता अनेक बँका तीन वर्षांच्या अंतराने ते अपडेट करण्यास सांगत आहेत.
एसबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अनेक खाती आहेत जी अपडेट करणे आवश्यक आहे. SBI व्यतिरिक्त, आत्तापर्यंत इतर कोणत्याही बँकेने KYC अपडेटमुळे खाती गोठवल्याची नोंद केलेली नाही. सध्या ते फक्त SBI पुरते मर्यादित आहे.
तुम्ही घरबसल्या KYC अपडेट करू शकता –
भारतभर कोविड-19 आणि लॉकडाऊन सुरू झाल्यापासून, SBI ने KYC कागदपत्रे ऑनलाइन स्वीकारण्यास सुरुवात केली. एसबीआय बँकेने केवायसी कागदपत्रे ऑनलाइन स्वीकारण्यास सुरुवात केली होती. केवायसी अपडेटसाठी ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही.