SCSS : आजच करा ‘या’ सरकारी योजनेत गुंतवणूक, मिळेल जबरदस्त परतावा; जाणून घ्या अधिक

SCSS : सध्या गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक करू शकता. अनेकजण सर्वात जास्त परतावा देणाऱ्या आणि कोणतीही जोखीम न घ्यावी लागणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. अशीच एक योजना आहे ज्यात तुम्हाला जास्त नफा मिळेल.

केंद्र सरकारतर्फे वृद्ध व्यक्तींसाठी एक विशेष योजना राबवली जात आहे. या योजनेत चांगले व्याज उपलब्ध असून त्यावर सध्या 8.2 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. 60 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला या योजनेत गुंतवणूक करता येते. तसेच 55 वर्षे ते 60 वर्षे वयोगटातील लोक ज्यांनी VRS घेतले आहे आणि ज्यांचे वय 60 वर्षे आहे ते निवृत्त संरक्षण कर्मचाऱ्यांना या योजनेत सहज गुंतवणूक करता येते.

30 लाखांपर्यंत करता येते गुंतवणूक

SCSS योजनेमध्ये एकूण 1000 रुपयांची गुंतवणूक करता येते. तुम्ही त्यात कमीत कमी 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. तसेच पूर्वी यात गुंतवणुकीची कमाल मर्यादा 15 लाख रुपये होती. परंतु जमा करण्यात आलेले पैसे खाते चालू करण्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी परिपक्व होते. खाते चालू करण्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी जमा केलेले पैसे परिपक्व होतात. जमा केलेल्या रकमेवर तिमाही आधारावर व्याज देण्यात येते. महत्त्वाचे म्हणजे या बचत योजनेत वृद्धांना कर लाभ मिळतो.

मिळेल शानदार परतावा

समजा तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर 1 लाख 41 हजार रुपये सहज मिळतात. समजा तुम्ही 3 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 4 लाख 23 हजार रुपयांचा परतावा मिळतो. जर तुम्ही 5 लाखांपर्यंतची गुंतवणूक केली तर 7 लाख 5 हजार रुपयांचा परतावा मिळतो.

इतकेच नाही तर 7 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 9 लाख 87 हजार रुपयांचा परतावा मिळतो.9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला 12 लाख 69 हजार रुपयांपर्यंतचा परतावा मिळतो. 11 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 15 लाख 51 हजार रुपयांपर्यंतचा परतावा मिळतो. 13 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 18 लाख 33 हजार रुपयांचा परतावा मिळतो. 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 21 लाख 15 हजार रुपयांचा शानदार परतावा मिळतो.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts