Sedan Sales: मागच्या महिन्यात देशात सणासुदीच्या काळात अनेक ऑटो कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बंपर डिस्काउंट ऑफर जाहीर केला होता. या बंपर ऑफरचा लाभ काही कंपन्यांना झाला तर काही कंपन्यांना नाही.
देशात मागच्या महिन्यात उपलब्ध असणाऱ्या वेगवेगळ्या ऑफर्समुळे ग्राहकांनी भरपूर खरेदी केली . यातच मार्केटमध्ये सेडान कारची देखील भरपूर मागणी पहिला मिळाली होती. आज आम्ही तुम्हाला मागच्या महिन्यात सर्वाधिक खरेदी केली जाणारी सेडान कारबद्दल माहिती देणार आहोत आणि इतर कारच्या विक्रीची स्थिती काय होती हे देखील सांगणार आहोत.
Maruti Dzire
ऑक्टोबर महिन्यातही लोकांनी मारुतीच्या डिझायरवर सर्वाधिक विश्वास ठेवला. केवळ 30 दिवसांत कंपनीने देशभरात 12321 युनिट्सची विक्री केली. तर सप्टेंबर महिन्यात कंपनीने 9601 मोटारींची विक्री केली. या कारने मासिक आधारावर 2720 पेक्षा जास्त युनिट्स विकल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यात सेडान कारच्या एकूण विक्रीत त्याचा वाटा 30.62 टक्के आहे.
Honda Amaze
मारुतीच्या डिझायरनंतर होंडाच्या अमेझला सर्वाधिक पसंती मिळाली. कॉम्पॅक्ट सेडानच्या सेगमेंटमध्ये येत असलेल्या या कारची एका महिन्यात 5443 युनिट्सची विक्री झाली. सप्टेंबर महिन्यात 4082 अमेझची विक्री झाली. सणासुदीच्या काळात डिझायरनंतर सेडानने 13.02 टक्के बाजारपेठ काबीज केली.
hyundai aura
सेडान कारच्या यादीत ह्युंदाईची ऑरा तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑक्टोबर महिन्यात एकूण 4248 युनिट्सची विक्री झाली. त्याच वेळी, सप्टेंबर महिन्यात एकूण 4239 युनिट्सची विक्री झाली. वर्षानुवर्षेही या कारने ऑक्टोबर महिन्यात चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात एकूण 2701 युनिटची विक्री झाली होती.
Tata Tigor
भारतीय कार कंपनी टाटाच्या टॉप-5 मध्ये टिगोर सेडानचाही समावेश करण्यात आला होता. ऑक्टोबर महिन्यात 4001 लोकांनी ही सेडान खरेदी केली. तर सप्टेंबर महिन्यात ती 3700 लोकांनी खरेदी केली होती. आकडेवारीनुसार, या कारने वर्षभरात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एकूण 1377 युनिट्सची विक्री झाली होती. कारने 190.56 टक्क्यांच्या वाढीसह जोरदार कामगिरी केली आहे.
honda city
या यादीतील होंडाची ही दुसरी कार आहे. महिन्यावर महिना आणि वर्ष दर वर्षी त्याच्या विक्रीत थोडीशी घट झाली. पण तरीही ऑक्टोबर महिन्यात त्याला लाईक करणाऱ्यांची संख्या 3250 होती. सप्टेंबर महिन्यात त्याची एकूण विक्री 3420 युनिट्स होती, जी ऑक्टोबरच्या तुलनेत 170 युनिट्स जास्त होती. गेल्या महिन्यात या कारने एकूण सेडान कार मार्केटमध्ये 10.91 टक्के हिस्सा घेतला.