पोलिसांना पाहून तळीरामांनी ठोकली धूम

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- राहुरी शहरात सार्वजनिक ठिकाणी तळीरामाची मैफील जमविणा-या लोंकावर राहुरी पोलिसांनी दि. 26 मे रोजी धाड टाकून कारवाई केली.

पोलिसांना पाहून तळीरामांनी धुम ठोकून पसार झाले. मात्र त्यांच्या तीन मोटरसायकली जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड रोडवर असलेल्या गाडगे महाराज काॅम्प्लेक्स समोरील मोकळ्या जागेत दि. 26 मे रोजी रात्री काही तळीराम मद्य प्राशन करत बसले होते.

यावेळी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ पोलीस पथकासह शहरात गस्त घालत होते. या दरम्यान त्यांना गाडगे महाराज काॅम्प्लेक्स समोर काही तरूण दारू पित बसलेले दिसून आले. पोलिसांना पाहून तळीरामांनी धुम ठोकून पसार झाले.

मात्र त्या ठिकाणाहून एम. एच. 17 सी. 9508, एम. एच. 17 एन. 8715, एम. एच. 17 एस 4926 या तीन दुचाकीसह दोन दारूच्या बाटल्या असा एकूण 40 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

याबाबत हवालदार आजिनाथ पाखरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत. तसेच तळीरामांचा पोलीस शोध घेत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts