ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीस यांचा चौकशीनंतर सनसनाटी दावा; म्हणाले, मला आरोपी, सहआरोपी बनवलं जाईल…

मुंबई : भाजप (BJP) नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबई सायबर पोलिसांनी (Mumbai Cyber Police) २ तास चौकशी केली. यामध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद (Press Conference) घेतली त्यामध्ये ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मीच ऑफिशियल सिक्रेट अॅक्टचं उल्लंघन केलं आणि मीच त्याचा आरोपी आहे अशा प्रकारची ही प्रश्नावली होती. हा घोटाळा उघड करून तुम्ही ऑफिशियल सिक्रेसी घोटाळ्याचं उल्लंघन केलंय, असा सवाल मला केला गेला.

मला आरोपी किंवा सहआरोपी बनवलं जाईल असे प्रश्न केले. मी त्याला उत्तर दिलं. माझ्यावर ऑफिशियल सिक्रसी अॅक्ट लागू होत नाही. माझ्यावर लागू झाला तर व्हिसल ब्लोअर अॅक्ट लागू झाला पाहिजे.

मी घोटाळा बाहेर काढला मी व्हिसल ब्लोअर आहे असं मी तपास यंत्रणांना सांगितलं आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना बोलताना सांगितले आहे. राज्यात बदल्यांचा महाघोटाळा झाला.

या महाघोटाळ्याची सर्व माहिती मी केंद्रीय गृहसचिवांना दिली. त्यानंतर उच्च न्यायालयाने या घोटाळ्याची चौकशी सीबीआयला सोपवली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं. म्हणजे घोटाळा झाला हे सिद्ध होते.

या घोटाळ्याची सरकारने चौकशी का केली नाही? सहा महिने अहवाल दाबून ठेवला. मी हा घोटाळा काढला नसता तर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा दबून गेला असता. मला पोलिसांनी प्रश्नावली दिली होती.

मी उत्तर देणार असल्याचं सांगितलं. काल त्यांनी हजर राहण्याची नोटीस (Notice) पाठवली. मी सभागृहात रोज विषय मांडत आहे. या सरकारच्या मंत्र्याचं दाऊद कनेक्शन, विरोधी पक्षासोबतचं षडयंत्रं याबाबत मी वारंवार बोलत आहे. त्यामुळे त्यांनी मला नोटीस पाठवली. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts