Mohammed Shami : सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटरांचे अनेक व्हिडिओ धुमाकूळ घालत असतात. चाहते त्यावर कमेंटही करतात. असाच एक व्हिडिओ टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा धुमाकूळ घालत आहे. यावेळी शमी क्रिकेटच्या मैदानात दिसत नाही तर तो एका शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.
दरम्यान शमीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचाही असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे काही चाहते शमीला धोनीची कॉपी तर करत नाही ना असा सवाल करत आहेत.
संघाला होतोय खूप फायदा
सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून या मालिकेत संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालताना दिसत आहे. यामुळे तो युवा खेळाडूंचा उत्साह कायम ठेवत आहे.
शमीने ठेवले धोनीच्या पावलावर पाऊल
शमीच्या रीलची चाहत्यांना भुरळ
पहा धोनीचा खास व्हिडिओ