अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी रायगडमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतीत मतभेद पुन्हा समोर आले आहेत.
एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अडगळीतले नेते असा उल्लेख करत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे, दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीदेखील अनंत गीते यांचं वक्तव्य योग्य नसल्याचं म्हटलं आहे.
तसेच त्यांनी काँग्रेस सोडली नसून त्यांना पक्षातून काढलं होत, असे ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल.अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असून शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.
त्यांनतर वातावरण तापलं आहे. आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही गीते यांचं वक्तव्य योग्य नसल्याचं म्हंटलं आहे. दरम्यान, आठवले यांनी “आनंद गीते यांचं वक्तव्य योग्य नाही. शरद पवार सन्माननीय नेते आहेत. कोणत्या पक्षाचे नेते नाहीत हे खरं आहे, मात्र ते महाराष्ट्राचे नेते आहेत.
शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष सोडला असं नाही, तर त्यांना काँग्रेसमधून बाहेर काढण्यात आलं. त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असं नाही,” असं रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.