ताज्या बातम्या

“शरद पवार साहेब महत्व देत नाही, संजय राऊतांसारखी माणसं सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात”; नितेश राणेंची राऊतांवर सडकून टीका

तुळजापूर : भाजप आमदार (BJP MLA) नितेश राणे (Nitesh Rane) यांनी तुळजापूरमधून (Tuljapur) शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्यासारखी माणसं सोलापरच्या बाजारात भेटत असाच उल्लेख त्यांनी केला आहे.

नितेश राणे म्हणाले, संजय राऊतांना किती महत्त्व द्यायचं हे आता महाराष्ट्रातील राजकारण्यांनी ठरवलं पाहिजे. ज्याला शरद पवार (sharad pawar) साहेब महत्व देत नाही,

ज्याला लोमत्यासारखे वापरतात त्याला आम्ही का महत्त्व द्यायचे?, असा सवाल करतानाच संजय राऊतांसारखी माणसं तुमच्या सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात. विकत मिळणाऱ्या लोकांबद्दल बोलू नये असं म्हणतात अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

मी चांगल्या कामासाठी आलोय. देवदर्शनासाठी आलोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर बाहेर काढावं, त्यांना आमच्याबरोबर मैदानात आणा, हीच तुळजाभवानीकडे मागणी आहे, असेही नितेश राणे म्हणाले.

घरात बसून मुख्यमंत्र्यांना कंटाळा आला नसेल. पण आम्हाला ते घरात बसल्याचा कंटाळा आला आहे. आमचे म्हणणे एवढंच आहे की, त्यांनी मैदानात यावं.

मर्दासारखे लढावं. आम्हाला नोटिसा पाठवून नामर्दासारखं लढू नका असे म्हणत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला आहे.

आताची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना नाही. ती दाऊद इब्राहिमीची बी टीम झाली आहे. त्यामुळे शिवजयंती किंवा इतर ठिकाणी त्यांचा उत्साह तुम्हाला दिसणार नाही असेही नितेश राणे म्हणले आहेत.

शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही म्हणून तर अजानची स्पर्धा घेतात का? कॅलेंडरवर हिंदुहृदयसम्राट ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे हे कोणी म्हटलंय? हे शिवसेनेने म्हटलंय.

हिंदुंचा प्रत्येक सण आला की त्यावर निर्बंध टाकणारे हेच सरकार आहे. अन्य धर्मियांच्या सणावर निर्बंध दिसणार नाहीत. सगळ्याबाबतीत हिंदुवर अन्याय होत असेल तर मग हिंदुत्वाची व्याख्या काय आहे यांची?

मुंबई- महाराष्ट्रातील हिंदू सुरक्षित नसेल तर मग काय? आज रझा आकादमीसारख्या संघटना हिंदुंवर ऊठसूठ अन्याय करत असतील तर मग त्यांच्यावर या लोकांना बंदी टाकायची नाही मग यांची हिंदुत्वाची व्याख्या काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts