मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे (MNS) व राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षांमध्ये मतभेद सुरु आहेत, यातच आता मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना चिमटा काढला आहे.
नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मनसेकडे लक्ष आहे, याचा आनंद वाटतोय, असा चिमटा काढत त्यांनी पवारांना टोला लगावला आहे.
तसेच शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अल्टिमेटम फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच (balasaheb thackeray) देऊ शकतात. तेच अल्टिमेटम देत होते. इतर कुणी राज्य सरकारला अल्टिमेटम देऊ शकत नाही, असे विधान केले होते.
त्यांच्या या विधानाचाही नांदगावकर यांनी समाचार घेतला आहे, ते म्हणाले, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे बाळासाहेबांच्यात तालमीत वाढले आहेत. त्यामुळे अल्टिमेटम देण्याचा गुण त्यांच्याकडे आला आहे, असा टोला बाळा नांदगावकर यांनी राऊत यांना लगावला आहे.
दरम्यान आज डोंबिवलीत मनसे आमदार राजू पाटील यांची पुतणी सायली हिच्या लग्नासाठी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर आले होते. तसेच यावेळी अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते.
पवारांचे लक्ष याचा आम्हाला आनंद
शरद पवार यांनी मनसेवर टीका केली होती, यावर नांदगावकर शरद पवार लवकर प्रतिक्रिया देत नाहीत, मात्र राज साहेबांच्या दोन्ही सभांनंतर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. म्हणजे शरद पवार यांचे राज ठाकरे आणि मनसेवर लक्ष आहे याचा आम्हाला आनंद आहे, असा चिमटा नांदगावकर यांनी काढला आहे.