Sharad Pawar : ‘पवारांना कर्नाटकला, बॉर्डरवर सोडले तरी कुणी ओळखणार नाही, मात्र मोदींकडे बघा..’

Sharad Pawar : भाजप गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, पाकिस्तानमधील तरुण म्हणतात आम्हाला मोदी सारखा नेता हवाय. आपण भाग्यवान आहोत मोदींच्या सत्तेत राहतोय. भावी पंतप्रधान असा काही विषय नसतो का? ज्यांचे खासदार आहेत ते पंतप्रधान होतील का? पवारांना जर कर्नाटकला मास्क घालून सोडलं तर कुणी ओळखणार नाही.

तसेच बॉर्डरवर सोडलं तरी कुणी ओळखणार नाही, मात्र मोदींकडे बघा, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. देवेंद्र फडणवीसांनी जो अर्थसंकल्प मांडला ज्याने अनेक घटकांना मदत केली. मात्र अजित पवारांनी जो अर्थसंकल्प मांडला तो स्वतःची घर भरणारा होता.

पुणे जिल्ह्यात अशी कुठली कंपनी नाही ज्यामध्ये पवारांची भागीदारी नाही? अजित पवार त्यांच्या विधानसभा मतदारसंघाला पिण्याचे पाणी देऊ शकले नाहीत, असा आरोप पडळकरांनी केला. यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पडळकर हे सातत्याने पवार कुटूंबावर टीका करत आहेत.

तसेच पडळकर म्हणाले, यांना जर मुख्यमंत्री करायचा असेल तर तीन वेगळी राज्य करावी लागतील. एक लवासा, एक बारामती, आणि एक मगरपट्टा. लवसाचे मुख्यमंत्री सुप्रिया सुळे आणि बारामतीचा मुख्यमंत्री अजित पवार यांना करा. हे तिन्ही राज्य एकत्र करून देश करा. त्याचा पंतप्रधान शरद पवारांना करा, असेही पडळकर म्हणाले.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय उत्तर देणार हे लवकरच समजेल. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी या सभेचे आयोजन केलेले. या सभेला आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts