मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीमध्येच (Mahavikas Aghadi) जुंपली असल्याचे दिसत आहे. महाविकास आघडीमधील नेत्यांकडून भाजपवर आरोप केले जात आहेत. तर भाजपच्या काही नेत्यांनी निषेध व्यक्त केला आहे तर काहींनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे.
भाजप (BJP) नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी अनिल बोंडे यांना जोरदार प्रत्युत्तर देत भाजपवर सडकून टीका केली आहे.
संजय गायकवाड यांनी अनिल बोंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, भाजपचे काही नेते पिसाळलेला कुत्रा चावल्यागत वागत असल्याचे संजय गायकवाड म्हणाले आहे.
शरद पवार साहेबांच्या कामाची उंची हे कधीच समजू शकत नाहीत. शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना उभं करण्याचे काम केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला सिंचनाची जोड दिली.
केंद्रीय कृषीमंत्री झाल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. हे धाडस फक्त शरद पवार हेच करू शकतात. शरद पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, मात्र ते कधीही कोणाला वाईट बोलले नाही. त्यांच्या घरावर अशापद्धतीने हल्ला होणे हे दुर्दैवी असल्याचे गायकवाड म्हणाले आहेत.
शरद पवार यांनी आपली संबंध हायात जनतेच्या सेवेसाठी घालवली, पवार यांनी कोणालाही कधी अपशद्ब वापरला नाही, मग पवार यांच्या घरावर हल्ला का करण्यात आला. हा प्रकार दुर्दैवी आहे.
हे आंदोलन एसटी कर्मचाऱ्याच्या एका तुकडीकडून करण्यात आले, हे आंदोलन पूर्वनियोजीत पद्धतीने करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजप राज्यातील सरकार अस्थिर करून पहात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
संजय गायकवाड यांनी गुणरत्न सदावर्ते (Gunratn Sadavrte) यांच्यावर आरोप केले आहेत. गुणरत्न सदावर्ते च्या सांगण्यावरून हल्ला करण्यात आल्याचे ते म्हंटले आहेत.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या अडची वर्षांपासून याना त्या कारणाने विरोधी पक्ष महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राज्यात हिंसा निर्माण करून, त्यांचा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव आहे, मात्र राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून, विरोधक त्यांच्या कामामध्ये कधीही यशस्वी होणार नसल्याचे खडसावून संजय गायकवाड यांनी सांगितले आहे.