ताज्या बातम्या

“शरद पवार पाहुण्यांना बारामतीला दुसऱ्या रस्त्याने नेतात आणि म्हणतात बारामतीचा विकास झाला”

पुणे : भाजप (BJP) नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे सतत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) टार्गेट करत असताना अख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता आज पुन्हा एकदा पडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

गोपीचंद पडळकर पुरंदर मध्ये बोलताना म्हणाले, शरद पवार पाहुण्यांना बारामतीला (Baramati) दुसऱ्या रस्त्याने नेतात आणि म्हणतात बारामतीचा विकास झाला. शरद पवारांनी बारामती तालुक्यातील काही गावांना जाणीवपूर्वक पाणी दिले नाही नाही. अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली आहे.

बारामतीच्या 42 गावांना पाणी नाही, असे ते म्हणाले. बारामतीतील या पवारांचे ऐकणारे राज्यात असे अनेक प्रांत आहेत. अजित पवार (Ajit Pawar) आज सत्तेत आहेत, उद्या ते सत्तेत नसतील. उद्या देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर तुम्हाला कोणी वाचवायला येणार नाही अशी टीका करत थेट इशाराच पडळकरांनी दिला आहे.

पुढे बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राज्यातील सरकारला वीज प्रश्नाबाबत घेरले आहे ते म्हणाले, या राज्यात शेतकऱ्यांच्या विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. राज्य सरकार त्यावर काहीही करायला तयार नाही.

देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले म्हणून यांनी वीज कनेक्शन (Electricity) तोडणी तात्पुरती थांबवली आहे. मात्र राज्यात लोडशेडिंग सुरूच आहे. आठ-आठ तास भारनियमन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

पुरंदर तालुक्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतातून 220 केबीची लाइन जाते. यात राष्ट्रवादीचे काही दलाल असून ते या सर्वांना पाठीशी घालत आहेत. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत.

सर्वसामान्य शेतकऱ्याच्या बागायत शेतातून या टॉवरची लाइन टाकायचे चालू आहे. या सर्वांचा विरोध म्हणून आम्ही तहसील कार्यालयावर मोर्चा काढत असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले आहे.

ओबीसी आरक्शणावरूनही गोपीचंद पडळकरांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणाचा (OBC reservation) खून करायचा होता, तो त्यांनी केला आहे.

ओबीसी आयोगाला पैसे दिले नाहीत. इतके दिवस सरकार झोपा काढत होते का, असा सवाल करत सरकारमधील काही लोकांना ओबीसींच्या जागा बळकावयाच्या आहेत, असा आरोप गोपीचंद पडळकरांनी सरकारवर केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts