Share Market : असे काही शेअर्स आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना खूप कमी वेळेत मालामाल करतात. अशातच आता सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 6 महिन्यांत 238 टक्क्यांपर्यंत उत्तम परतावा दिला आहे. दरम्यान, कंपनीने काही दिवसांपूर्वी कर्ज कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे.
गुंतवणूकदारांना मिळाला उत्तम परतावा
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे, सौर ऊर्जा निर्मिती कंपनी सुझलॉन एनर्जी लिमिटेडने आपल्या गुंतवणूकदारांना 6 महिन्यांत बंपर परतावा दिला आहे. मागील 6 महिन्यांत कंपनीची प्रचंड वाढ झाली असून ज्यात कंपनीने शेअरच्या किमतीत गुंतवणूकदारांना 238 टक्क्यांपर्यंत उत्तम परतावा दिला आहे.
गुंतणूकदार झाले मालामाल
माहितीनुसार, मार्च 2023 अखेर सुझलॉन एनर्जी लिमिटेडचा शेअर 7.05 रुपये इतका होता, जो कंपनीसाठी निम्न स्तर मानला जातो. तसेच मार्च महिन्यापासून, कंपनीच्या शेअर्सने खूप नफा मिळवला आहे, 7 रुपयांच्या पेनी स्टॉकपासून 6 महिन्यांमध्ये मल्टीबॅगरपर्यंत. महत्त्वाचे म्हणजे काही काळापूर्वी सुझलॉनने कर्ज कमी करण्याची योजना जाहीर केली होती, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आहे.
शेअर्स वाढण्यामागचे कारण
या कंपनीच्या शेअरला मल्टीबॅगरचा दर्जा मिळाला आहे, कारण मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 300 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि सुझलॉनलाही नुकतेच नवीन ऑर्डर मिळाल्या आहेत. त्यामुळे कंपनीचे ऑर्डर बुक आणि फंडामेंटल्स खूप मजबूत झाले आहेत.
कंपनीची माहिती
शेवटच्या ट्रेडिंग आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सुझलॉन एनर्जीच्या शेअरमध्ये 0.55 रुपयांची घसरण झाली होती आणि तो 29.14 रुपयांवर बंद झाला होता. आता हेच शेअर्स लवकरच 40 रुपयांच्या पुढे जाऊ शकतील. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 29.82 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 6.60 रुपये इतका आहे. सुझलॉन एनर्जीचे मार्केट कॅप 39,553.55 कोटी रुपये आहे. तुम्ही हा स्टॉक रु. 40 च्या लक्ष्य किमतीसाठी रु. 25 च्या स्टॉप लॉससह सहज ठेवू शकता.