Share Market News : देशात शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे प्रमाण दिवसोदिवस वाढत आहे. अशा वेळी बाजारातील काही शेअरने गुंतवणूकदारांचे स्वप्न पूर्ण केलेले आहे.
कारण शेअर बाजारातील कॅप्टन पाईप्स च्या शेअरने गुंतवणूकदारांना मजबूत नफा दिला आहे. सलग दुसऱ्या दिवशी कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर आहेत. यामुळे बीएसईमध्ये कॅप्टन पाईप्सच्या शेअरची किंमत रु.602 वर पोहोचली आहे.
दरम्यान, 13 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत 300 रुपयांच्या पातळीवर होती. आज ती 600 च्या पुढे गेली आहे. म्हणजेच अवघ्या 15 दिवसांत SME कंपनीच्या शेअरची किंमत 100 टक्क्यांनी वाढली आहे.
10 जानेवारीला कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सच्या वितरणावर बोर्ड सदस्य 27 जानेवारीला निर्णय घेतील.
गुंतवणुकदारांसाठीही मागील एक वर्ष उत्तम होते
3 फेब्रुवारी 2022 रोजी कंपनीच्या एका शेअरची किंमत BSE मध्ये रु.58.50 होती. आता 600 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच अवघ्या एका वर्षात या समभागाने स्थिर गुंतवणूकदारांना 900 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
या काळात कॅप्टन पाईप्सच्या शेअर्समध्ये 450 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. हा शेअर आज 52 आठवड्यांच्या उच्चांकावर व्यवहार करत आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा नीचांक 57.50 रुपये आहे. तर, मार्केट कॅप रु. 279.84 कोटी आहे.