Share Market News : आजकाल अनेकजण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास इच्छुक असतात. मात्र कोणत्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक करावे हे माहित नसते. पण तुम्ही तुमच्या शेअर मार्केट तज्ज्ञांशी संवाद साधून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करू शकता.
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करणे फायद्याचे आहे मात्र तितकेच जोखमीचे देखील आहे. अनेकजण वेगवेगळ्या शेअर्समध्ये पैसे गुंतवणूक करत असतात. ज्या गुंतवणूकदारांनी Kay Cee Energy आणि Infra च्या IPO मध्ये पैसे गुंतवले होते ते आता मालामाल झाले आहेत.
या कंपनीचे शेअर्स आज 366.7 टक्क्यांच्या प्रचंड प्रीमियमवर सूचीबद्ध झाले आहेत. या शेअर्सची किंमत 54 रुपये होती आणि ती NSE SME प्लॅटफॉर्मवर 252 रुपयांमध्ये सूचीबद्ध होती. कंपनीचा IPO 959 वेळा सबस्क्राइब झाला आहे.
29.5 लाख गुंतवणूकदारांना ऑफर दिली होती आणि 200 कोटींहून अधिक समभागांसाठी बोली प्राप्त केली होती. IPO च्या किरकोळ भागाला 1600 वेळा बिड मिळाले तर NII भाग 1300 वेळा सबस्क्राइब झाला.
Kay Cee Energy and Infra कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, IPO मधून मिळालेला निधी कंपनीच्या भांडवली गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरेल. Kay Cee Energy and Infra कंपनी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम कंपनी आहे जी सरकारी आणि खाजगी कंपन्यांना विशेष ऊर्जा सेवा पुरवते.
गेल्या वर्षी जून 2023 Kay Cee Energy and Infra कंपनीचा महसूल 9.55 कोटी रुपये होता आणि नफा 1.2 कोटी रुपये होता. येत्या काळात या कंपनीच्या शेअर्समध्ये देखील चांगली उसळी पाहायला मिळेल. भारतात येत्या काही काळापर्यंत 416 गिगावॅटपर्यंत ऊर्जा लागेल अशी आशा आहे.
वर्षातील पहिला IPO
गुजरातस्थित ज्योती CNC ऑटोमेशनने त्यांच्या IPO साठी प्रति शेअर 315-331 रुपये किंमत बँड सेट केला आहे. ज्योती CNC चा IPO 9 जानेवारीला उघडणार आहे तर 11 जानेवारीला तो बंद देखील होणार आहे. 8 जानेवारी रोजी ते अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होईल. गुंतवणूकदार 45 शेअर्ससाठी बोली लावू शकतात.