Share Market Update : शेअर बाजारात पैसे कमवण्यासाठी सर्वजण सतत ताज्या घडामोडी (latest developments) जाणून घेते असतात, मात्र आता तुम्ही मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची (Reliance Industries) दूरसंचार कंपनी जिओ (Jio) सर्वात मोठा IPO लॉन्च (Launch) करणार असून त्याबाबत जाणून घ्या.
हिंदू बिझनेस लाइनच्या रिपोर्टनुसार, उद्योगपती मुकेश अंबानी RIL च्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) याबाबत घोषणा करू शकतात.
अंबानींच्या योजनेत त्यांची दूरसंचार फर्म रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (RJPL) आणि RIL ची उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) साठी स्वतंत्र IPO समाविष्ट आहेत.
या दोन कंपन्यांच्या IPO च्या माध्यमातून अंबानी 50,000 कोटी ते 75,000 कोटी रुपयांच्या दरम्यान मोठी रक्कम उभारण्याचा विचार करत आहेत. या IPO नंतर या दोन्ही कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध होतील.
त्याचवेळी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात लिस्टिंगसोबतच या दोन्ही कंपन्यांची ग्लोबल लिस्ट होऊ शकते. रिलायन्स जिओला अमेरिकेतील नॅस्डॅक प्लॅटफॉर्मवर देखील सूचीबद्ध केले जाऊ शकते. Nasdaq हे तंत्रज्ञान कंपन्यांसाठी जगातील सर्वात मोठे मार्केटप्लेस आहे.
सूत्रांनी सांगितले की रिलायन्स रिटेलचा IPO लॉन्च डिसेंबर २०२२ पर्यंत होईल. यानंतर रिलायन्स जिओचा IPO लॉन्च होण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये रिलायन्स जिओने फेसबुक आणि गुगलसह १३ गुंतवणूकदारांना ३३ टक्के स्टेक विकले होते.
तथापि, जर रिलायन्सने या दोन कंपन्यांकडून अंदाजे रक्कम वाढवली तर हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. सध्या LIC चा IPO सर्वात मोठा मानला जातो. हा IPO 21 हजार कोटींचा आहे. LIC चा IPO लॉन्च ४ मे रोजी होणार आहे.