अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- हिंदूधर्मरक्षक स्व.अनिलभैय्या राठोड हे आमच्या सारख्या सामान्य शिवसैनिकांचे दैवत होते. त्यांच्या अकाली निधनाने सामान्य शिवसैनिक पोरके झाले आहेत. शिवसैनिक अनिलभैय्यांना कदापी विसरू शकत नाहीत. पण आता नगर शहराला किरणभाऊ काळेंच्या निर्भिड नेतृत्वाची गरज आहे, असे प्रतिपादन लखन छजलानी यांनी केले आहे.
छजलानी यांच्यासह अनेक सामान्य शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा झेंडा हाती घेत पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी छजलानी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष खलील सय्यद, अनंतराव गारदे, निजाम जहागीरदार,खजिनदार मोहनराव वाखुरे, सचिव प्रशांत वाघ, सहसचिव गणेश आपरे, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट, क्रीडा विभाग अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना लखन छजलानी म्हणाले की,अनिलभैय्यां सारखा लोकनेता यापूर्वी झाला नाही, भविष्यातही होणार नाही. परंतु त्यांच्या अकाली निधनानंतर सामान्य शिवसैनिकांमध्ये छत्र हरपल्याची भावना आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून किरणभाऊ निर्भीडपणे शहराला दहशतमुक्त ठेवण्यासाठी काम करत आहेत.
स्व.अनिलभैय्यांनी सर्व समाजघटकांना कायम संरक्षण देण्याची भूमिका घेतली होती. आजच्या वर्तमानामध्ये नगरकरांना संरक्षण देण्याची ताकद केवळ किरणभाऊंमध्ये आहे. म्हणूनच माझ्यासारख्या सामान्य शिवसैनिकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे, असे प्रतिपादन यावेळी छजलानी यांनी केले.
छजलानी पुढे म्हणाले की, संरक्षणाबरोबरच आज शहराला विकासाची गरज आहे. किरण काळेंमध्ये विकासाची दूरदृष्टी आहे. शहराच्या विकासाबद्दल त्यांची असणारी तळमळ पाहूनच आम्ही सामान्य शिवसैनिकांनी इथून पुढे शहरामध्ये काँग्रेस बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. जशी आम्ही अनिलभैय्यांना त्यांच्या हयातीत साथ दिली तशीच खंबीर साथ आम्ही किरणभाऊंना, काँग्रेस पक्षाला देऊ.
किरण काळे म्हणाले की, लखन छजलानी आणि तरुण शिवसैनिकांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास दाखवत काँग्रेसमध्ये केलेला प्रवेश ही माझी जबाबदारी वाढविणारा आहे. स्व.अनिलभैय्यांच्या कार्यकर्त्यांना मी कधीही निराश करणार नाही. त्यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे खंबीरपणे उभा राहील. अनिलभैय्या हेच शहराचे ओरिजनल भैय्या होते आणि राहतील. त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही.
त्यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता हा स्वाभिमानी असुन कुणाच्याही दावणीला कदापिही जाणारा नाही. त्यांच्या आत्मसन्मानाला काँग्रेस पक्ष कधीही ठेच पोहोचू देणार नाही. महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आ.डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांच्या माध्यमातून नगर शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी काम केले जाईल, असे यावेळी काळे म्हणाले.
यावेळी छजलानी यांच्यासह शरद दिवटे, हर्षल नकवाल, करण उदास, तरुण चव्हाण, जितू छजलानी, सोनू संगत, राम छजलानी, परेश बधवणे, शुभम छजलानी, आकाश कदम, रितेश छजलानी, रितिक परदेशी, योगेश बासोडे, हर्षल वाकडे आदी सामान्य शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.