शिवसेना कार्यकर्त्याची गळफास घेवून आत्महत्या..!

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022  Ahmednagar News :- नगर तालुक्यातील शिरढोण येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते सुदाम रामदास वाघ यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.

त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वाघ यांनी आत्महत्या का केली याचे कारण • अद्याप समजू शकले नाही. शिरढोण (ता. नगर) शिवारात अंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह निदर्शनास आला.

तो सुदाम रामदास वाघ यांचा असल्याचे समोर आले. याबाबतची माहिती नगर तालुका पोलिसांना देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान वाघ यांनी कोणत्या कारणातून आत्महत्या केली याबाबतची माहिती अद्याप समजली नाही,

याविषयी अधिक तपास करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक सानप यांनी दिली. मयत सुदाम वाघ हे कट्टर शिवसैनिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,वडील असा परिवार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts