BSNL : भारतातील सरकारी दिग्ग्ज टेलिकॉम कंपनी म्हंटल की आपल्यासमोर BSNL चे नाव डोळ्यासमोर येते. ग्राहकांना परवडतील असे प्लॅन्स कंपनी सतत सादर करत असते. स्वस्त प्लॅन्समुळे कंपनी एअरटेल, जिओ यांसारख्या खाजगी दिग्ग्ज टेक कंपन्यांना सतत टक्कर देत असते.
या कंपनीच्या ग्राहकांची संख्याही खूप जास्त आहे. परंतु, आता या कांपनीने आपल्या ग्राहकांना खूप मोठा धक्का दिला आहे. कारण या कंपनीने आपल्या चार रिचार्ज प्लॅन्सची किंमत गुपचूप वाढवली आहे. हे रिचार्ज प्लॅन्स कोणते आहेत पाहुयात सविस्तर. ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजून रिचार्ज करावा लागणार आहे.
या प्रीपेड प्लॅनची वैधता कमी झाली
यादीतील पहिला प्लॅन 107 रुपयांचा जो आधी 40 दिवसांच्या वैधतेसह येत होता. आता या प्लानची वैधता 35 दिवसांपर्यंत कमी केली आहे.तसेच यात मिळणाऱ्या फायद्यांमध्ये कोणताही बदल केला नाही. या प्लॅनमध्ये 3GB डेटा + 200 मिनिटे व्हॉइस कॉलिंग आणि BSNL Tunes 35 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहेत.
त्यानंतर, कंपनीचा 197 रुपयांचा प्लॅन आहे. जो आधी 84 दिवसांच्या वैधतेसह येत होता. मात्र, आता त्याची वैधता 70 दिवसांवर करण्यात आली आहे. यापूर्वी, या प्लॅनसह, वापरकर्त्यांना पहिले 18 दिवस दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉलिंग, दररोज 100 एसएमएस आणि झिंग सबस्क्रिप्शन दिले जात होते मात्र आता ते 15 दिवसांपर्यंत कमी केले आहे.
तिसरा 397 रुपयांचा प्लान आहे जो अगोदर 180 दिवसांच्या वैधतेसह येत होता, परंतु आता फक्त 150 दिवसांची वैधता असणार आहे. यात मोफत सुविधांमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS यांचा समावेश आहे. याशिवाय मोफत PRBT सेवा आणि लोकधुन सामग्रीचा समावेश असणार आहे.
चौथा 797 रुपयांचा प्लॅन असून जो अगोदर 365 दिवसांची वैधता आणि 60 दिवसांच्या मोफत सुविधांसह येत होता, आता त्याची वैधता 300 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली असून ग्राहकांसाठी आता तो मोफत सुविधांसह फक्त 60 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, दररोज 2GB डेटा आणि दररोज 100 SMS या सुविधा ग्राहकांना मिळतीलच.