अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :-संगमनेर(वेबटीम) ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वसामान्यांसाठी मोफत लस उपलब्ध करुन दिली आहे.
असे असताना तालुक्यातील निमगाव जाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरि कांकडून लसिकरणासाठी ५ते१० रुपये आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती संगमनेर पंचायत समितीचेविरोधी पक्षनेते अशोक सातपुते यांनी चित्रीकरण करुन उघडकीस आणली आहे
कोविड संकटाच्या काळात कोविड बाधित रुग्णांना दिलासा देण्याऐवजी सर्व त्रच लुटमार सुरु आहे. हे होत असताना आता लसीकरणासाठी नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. दरम्यान शासनाने सर्वत्र मोठ्या वेगाने लसीकरण सुरु केले आहे.
आता अठरा वर्षांवरील सर्वांनाच 1 मे पासून कोविडची लस मिळणार आहे. लस घेण्यासाठी सर्वच लसीकरण केंद्रावर मोठमोठ्या रांगा लागत आहेत. शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत लसीकरण होत असताना
निमगाव जाळी मध्ये मात्र वेगळाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या लसीकरणकेंद्रा वर दोन हजार लसीकरण झाले आहे या लसीकरणासाठी नागरिकांकडून५ते १० रुपये घेतले जात आहेत.
पैसे घेण्यासाठी एका महिला कर्मचाऱ्याने टेबलावरच एक बॉक्स ठेवला असून त्यात पाच ते दहा रुपये टाकावे असे सांगून नाव नोंदणी केली जात आहे. या बाबतची माहिती पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते अशोक सातपुते यांनासम जताच
त्यांनी अचानकपणे निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन पैसे घेतले जात असल्याचेचित्रीकरणकेले त्यामुळे तेथील कर्मचार्यांची एकचधांदल उडाली. या प्रकरणी सातपुते
यांनी जाब विचार ताच तेथील डॉक्टर व महिला कर्मचार्यांनी पैसे घेत असल्याचे कबूल केले मात्रआम्ही आजच पैसे घेतले आहेत. तेही नागरिकां च्या इच्छेनुसार यापुढे असे घडणार नाही असे म्हणत सातपुते यांच्याकडे विनवणी केली.
मात्र सातपुते यांनी याबाबतचे सर्व पुरावे गोळा करत तालुका आरोग्य अधि कारी डॉ सुरेश घोलप यांना निवेदन देऊन निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
कोरोना संकटात शासकीय कर्मचारी लाचखोरीची सवय सोडण्यास तयार नस ल्याचे दिसत आहे. कोरोनामुळे सर्वांचीच आर्थिक परिस्थिती ढासाळलेली असताना उपचारासाठी किंवालसीकरणासाठीअशा प्रकारे गैरमार्गाने पैसे उकळले जात अस ल्यामुळे आरोग्य विभागाच्या कारभारा विषयी सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.