मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची धक्कादायक बातमी

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  राज्याचा गाडा जिथून चालवला जातो आणि सर्वसामान्यांची तपासणी केल्याशिवाय, तसेच पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याच मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले. दरम्यान, मंत्रालयात प्रवेश करतेवेळी इतकी कडक सुरक्षा असताना आतमध्ये बाटल्यांचा खच सापडणं म्हणजे हे मंत्रालय आहे की दारूचा अड्डा? अशा प्रकारची टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून केली आहे.

मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच सापडल्याची बातमी @abpmajhatv वर पाहिली मंत्रालयात प्रवेश करतेवेळी इतकी कडक सुरक्षा असताना आतमध्ये बाटल्यांचा खच सापडणं म्हणजे हे मंत्रालय आहे की दारूचा अड्डा? मा.@CMOMaharashtra यांनी गेले दिड वर्ष मंत्रालयाचं तोंड पाहिलं नाहीये मग हे होणारच..,

अशा प्रकारची टीका भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. पुढे त्या म्हणाल्या की, या सगळ्या प्रकरणावर सामान्य प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडून उत्तर येणं अपेक्षित आहे.

प्रशासन करतंय काय? तुमचं स्वतःच्या प्रशासनाकडे लक्ष नाही मग राज्याचे ‘बुरे हाल’ होणारच.., अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts