Smartphone Blast : स्मार्टफोनमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे बॅटरी. आज अनेकांकडे स्मार्टफोन असल्याचे आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे.
एका लहान मुलाच्या हातातच गेम खेळत असताना स्मार्टफोन फुटला आहे. जर तुम्हीही स्मार्टफोन वापरताना काही चुका करत असाल तर त्या आजच टाळा नाहीतर तुमच्या ते जीवावर बेतू शकते.
मॅन्युफॅक्चरिंग दोषामुळे किंवा वापरकर्त्यांच्या निष्काळजीपणामुळे असा अपघात होतो. सामान्यतः वीज पुरवठ्यात समस्या आल्यानंतर इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि स्मार्टफोनला आग लागण्याची जास्त शक्यता असते. अनेकजण चार्जर जास्त पॉवर असलेले लोकल वापरतात. त्यामुळे वीज पुरवठ्यातही समस्या निर्माण होऊन बॅटरी स्फोटासारखी परिस्थिती निर्माण होते.
क्रमांक-1
जर तुम्ही लोकल चार्जर वापरत असाल, तर तो आजपासून वापरू नका. बॅटरी खराब होऊन ब्लास्ट होते. कारण या चार्जरमध्ये पॉवरचा प्रवाह कमी-जास्त होतो आणि बॅटरीवर दबाव येतो.
क्रमांक 2
फोनची बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होण्यापूर्वी तो चार्जिंगला लावा. तसेच फोन १०० टक्के चार्ज करू नका. फोन जास्त चार्ज केला तर त्याच्या बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होऊन जास्त दबाव येतो. त्यामुळे 95-98 टक्के झाला की चार्जिंग बंद करा.
क्रमांक 3
वारंवार गेम खेळली की स्मार्टफोन जास्त गरम होतो त्यामुळे फोनच्या बॅटरीवरही परिणाम होतो. तसेच फोनचा प्रोसेसर वेगाने काम करतो आणि फोन खूप गरम होतो. त्यामुळे तुमचा जास्त गरम होत असेल तर फोन थोडा वेळ बंद करा आणि लगेच चार्जिंग करणे टाळा.
क्रमांक-4
चार्जिंग चालू असताना फोनचा वापर टाळा. असे केल्यास तुमचा फोन ब्लास्ट होऊ शकतो.