iPhone Under 21000 : सध्या ऑनलाइन क्लासेस तसेच इतर कामांमुळे स्मार्टफोनचा वापर वाढत चालला आहे. आजपासून कॅशिफाईचा आयफोन सेल सुरु झाला आहे. हा सेल 15 जानेवारीपर्यंत असणार आहे.
या ठिकाणी आयफोन 21 हजार रुपयांना मिळत आहे. त्यामुळे तुम्ही येथून स्वस्तात आणि जबरदस्त फीचर्स असणारा आयफोन विकत घेऊ शकता.
21,999 रुपयांना मिळतोय iPhone
कॅशिफायचे सह-संस्थापक नकुल कुमार म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत प्रीमियम स्मार्टफोन विकत आहोत. आम्हाला माहित आहे की अनेकांना स्वस्तात भन्नाट फीचर्स असणारे स्मार्टफोन खरेदी करावे लागतात.
जर तुम्हाला कमी किमतीत आयफोन घ्यायचा असेल तर कॅशिफाय या ठिकाणाहून तुम्ही विकत घेऊ शकता. कारण पुनर्विक्रेता मिंट-कंडिशन्ड रिफर्बिश्ड ऍपल आयफोन रु. 21,999 च्या सुरुवातीच्या किंमतीला विकणार आहे. खरेदीसाठी तुम्हाला कॅशिफायच्या वेबसाइटवर जावे लागेल.
21,999 रुपयांना मिळतोय iPhone X
आयफोन व्यतिरिक्त सॅमसंग, शाओमीसह अनेक कंपन्यांचे प्रीमियम स्मार्टफोन अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत. iPhone 12 Pro Max 67,999 रुपये तर iPhone 11 29,499 रुपयांना आणि iPhone X 21,999 रुपयांना सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहे.
सॅमसंगही आहे सवलत
या ठिकाणी Samsung S21 Plus 5G ची प्रारंभिक किंमत 35,999 रुपये आहे. तसेच Xiaomi Note 9 Series वर बंपर डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या रिपब्लिक डे सेलमधूनही स्वस्तात स्मार्टफोन विकत घेऊ शकता.
काय नूतनीकरण केले आहे
नूतनीकृत म्हणून टॅग केलेली उत्पादने प्रथम साफ केली जातात. जर डेटा काढून टाकल्यानंतर, दुरुस्तीची गरज असेल तर ते देखील केले जाते. त्यानंतर ते उत्पादन पुन्हा तपासले जाते आणि पुन्हा पॅक करून विक्रीसाठी लाँच केले जाते.