अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- भारतीय समाजातील स्त्रिया त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा व्यक्त करु शकतात का? तर याचं उत्तर नाही असंच दिलं जाईल, किंवा 21 व्या शतकातलं पहिलं दशक संपेपर्यंत तरी या प्रश्नाचं उत्तर नाही असंच होतं. परंतु आता यात थोडाफार बदल होऊ लागला आहे.
महिला आता कामसुखाबद्दलही बोलत आहेत. आपल्याकडे असं म्हटलं जातं की, पुरुष प्रेम करतो ते स्त्रीकडून सेक्स मिळवण्यासाठी, तर स्त्रिया सेक्स करतात ते पुरुषाकडून प्रेम मिळवण्यासाठी. यावर आपणही विश्वास ठेवत आलो आहोत. काही वर्षांपूर्वी जेव्हा आपल्याकडे सेक्स क्लिनिक सुरु होऊ लागले, तेव्हा सुरुवातीची अनेक वर्ष कधीही कोणतीही महिला अशा क्लिनिकमध्ये गेली नाही.
हे चक्र बरीच वर्ष चाललं. आता तसं चित्र राहिलं नाही.स्त्रिया स्वत: पुरुषांना घेऊन क्लिनिकमध्ये जाऊ लागल्या आहेत आणि त्यांच्या समस्या सांगू लागल्या आहेत, त्यामुळे आता कोरोना काळात सेक्स करावा कि नाही याबाबतही उघड चर्चा होऊ लागली आहे.
आता द टेरेंस हिगिंस ट्रस्ट या संस्थेने कोरोना काळात सुरक्षित सेक्ससंबंधीच्या काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. किस करणं टाळावं, चेहऱ्याला मास्क बांधावे आणि संभोगावेळी चेहेरा समोरासमोर येणार नाही, अशाच पोझिशन्स असाव्या, अशा काही सूचना या संस्थेने दिल्या आहेत. THT ही युकेतली HIV आणि सेक्च्युअल हेल्थ याविषयांवर काम करणारी नामांकित स्वयंसेवी संस्था आहे.
ऐकायला अवघड वाटत असलं तरी “कामेच्छा, शारीरिक आणि भावनिक जवळीकीची नैसर्गिक इच्छा पूर्ण करणं आणि हे करताना कोव्हिड-19 चा फैलाव होणार नाही याची खबरदारी घेणं आवश्यक आहे,” असं या संस्थेचं म्हणणं आहे. जगभरात अजूनही सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
मात्र, इतक्या महिन्यांच्या लॉकडाऊननंतर लोकांनी अनिश्चित काळासाठी सेक्स करणं थांबवावं, अशी अपेक्षा चुकीची असल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. घराबाहेरच्या जोडीदाराबरोबर सेक्स करणार असाल तर खूप जास्त लोकांबरोबर करू नका. त्यांची संख्या अगदीच मोजकी असायला हवी, असा सल्ला देण्यात आला आहे.
तसंच स्वतःला किंवा आपल्या जोडीदाराला कोव्हिड-19 आजाराची काही लक्षणं आहेत का, याकडे लक्ष ठेवा आणि लक्षणं आढळल्यास स्वतःला विलग करा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
शिवाय, नव्या जोडीदाराबरोबर वेळ घालवणार असाल तर सेक्सआधी त्याला किंवा त्याच्या कुटुंबातल्या इतर कुणाला कोव्हिडची लक्षणं आहेत का, त्यांच्या घरी कुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळलं आहे का, याची विचारपूस जरूर करा असाही सल्ला देण्यात आला आहे.