ताज्या बातम्या

Silai Machine Yojana : अनेकांनी घेतला ‘या’ योजनेचा लाभ; तुम्हीही आजच करा अर्ज

Silai Machine Yojana : आजही स्त्रियांना स्वत:चं आयुष्य जगण्यासाठी अनेक संकटाचा (Problem) सामना करावा लागत आहे.

त्यांची ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने (Government) स्त्रियांना मोफत शिलाई मशीन (Free Silai Machine) देण्याची योजना सुरू केली आहे.

मोफत शिलाई मशीन योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत भारत सरकार (Government of India)महिलांना शिलाई मशीन मोफत देत आहे.

या योजनेअंतर्गत सरकार देशातील प्रत्येक राज्यात महिलांना 50 हजार शिलाई मशीन मोफत देत आहे. मोफत शिलाई मशीन योजना फक्त महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे.

पुरुष या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया –

सध्या ही योजना काही राज्यांमध्येच लागू करण्यात आली आहे. 20 ते 40 वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल. अशा परिस्थितीत मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचा रोजगार (Employment)सुरू करू शकता.

तुम्हालाही मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास तुम्हाला भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइट(Official website) https://www.india.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला या वेबसाइटवरून मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज (Application)डाउनलोड करावा लागेल.

त्यानंतर हा फॉर्म काळजीपूर्वक भरा. फॉर्म भरताना त्यात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. असे झाल्यास, तुमचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो.

फॉर्म काळजीपूर्वक भरल्यानंतर, तो सर्व आवश्यक कागदपत्रांसह संलग्न करा आणि तो संबंधित विभागाकडे जमा करा. योजनेअंतर्गत अर्ज करताना, तुम्हाला आधार कार्ड, वयाचा पुरावा, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, समुदाय प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक आणि अपंगत्वाच्या बाबतीत पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक असेल.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts