ताज्या बातम्या

SIM Card : मोबाईलचे सिमकार्ड एका बाजूने का कापले जाते? जाणून घ्या त्यामागचे कारण

SIM Card : मोबाईलचा (Mobile) शोध लागल्यापासून त्यात अनेक गोष्टींचा बदल (Change) होत गेला. दरम्यान, सिम कार्ड हा मोबाईलचाच एक छोटासा भाग आहे.

हे सिम कार्ड आकाराने खूप लहान असले तरी ते खूप महत्वाचे आहे. हे सिमकार्ड कोपऱ्यात एका बाजूला कापलेले (Cut) असते.

तुम्हाला माहीत नसेल की सुरुवातीच्या काळात सिमकार्ड एका कोपऱ्यातून कापले जात नव्हते. जेव्हा मोबाईल फोनमध्ये वापरले जाणारे सिमकार्ड पहिल्यांदा बनवले गेले तेव्हा त्याची रचना (SIM card structure) यापेक्षा पूर्णपणे वेगळी होती.

त्या काळात सिमकार्डवर कोणताही कट नव्हता. अशा स्थितीत मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकताना त्याचा सरळ आणि उलटा भाग कोणता याची खात्री लोकांना करता आली नाही?

अशा परिस्थितीत ही समस्या लक्षात घेऊन दूरसंचार कंपन्यांनी (Telecom companies) सिमकार्डचे डिझाइन (SIM card design) बदलून ते एका कोपऱ्यातून कापले. या बदलामुळे लोकांना मोबाईलमध्ये सिमकार्ड बसवणे सोपे झाले.

अशा स्थितीत हळूहळू सर्व दूरसंचार कंपन्या एका कोपऱ्यातून त्यांच्या सिमकार्डवर कट करू लागल्या. आता सर्व स्मार्टफोन्सचे सिम ट्रे (SIM tray) देखील एका कोपऱ्यातून कट करून येतात जेणेकरून लोकांना फोनमध्ये सिम ठेवताना कोणत्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts