Smart TV Offer : सध्या स्मार्ट टीव्ही वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अनेक स्मार्ट टीव्ही निर्मात्या कंपन्या आपले नवनवीन स्मार्ट टीव्ही लाँच करत असतात. अशातच आता लवकरच कोडॅक स्मार्ट टीव्ही आपली आगामी स्मार्ट टीव्ही सीरिज घेऊन येत आहे.
यात कंपनी 24, 32 आणि 40 इंच टीव्हीचा समावेश असणार आहे. तुम्हाला हे टीव्ही अवघ्या 6,499 रुपयांना खरेदी करता येणार आहेत. त्यामुळे तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. परंतु अशी भन्नाट संधी तुम्हाला कुठे मिळत आहे? जाणून घ्या.
जाणून घ्या Kodak SE सीरिज स्मार्ट टीव्हीची किंमत
कोडॅकचे नवीन टीव्ही 24-इंच, 32-इंच आणि 40-इंच डिस्प्ले आकारात येत आहेत. या स्मार्ट टीव्हीच्या नवीन लाइनअपची सुरुवातीची किंमत 6,499 रुपये इतकी असणार आहे. मात्र, 32-इंच आणि 40-इंच मॉडेलच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
ऍमेझॉनवर मिळत आहे सवलत
तुम्ही आता ऍमेझॉन इंडियावरील ग्रेट समर सेल दरम्यान कोडॅक खूप स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. Amazon चा हा सेल 4 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे.
जाणून घ्या स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये
Kodak SE सीरिज स्मार्ट टीव्ही 40 इंचांपर्यंतच्या डिस्प्लेसह येतो. 24-इंच आवृत्ती HD-रेडी असून 32-इंच मॉडेल HD स्क्रीन रिझोल्यूशन देते. 40-इंच हे FHD मॉडेल असून या टीव्हीच्या ऑडिओबद्दल बोलायचे झाले तर, 24-इंच मॉडेलमध्ये 20W स्पीकर दिले जाणार आहे.
तसेच इतर दोन मॉडेल्समध्ये 30W स्पीकर दिले जात आहेत. याबाबत कंपनीचे असे मत आहे की या स्मार्ट टीव्हीमध्ये अॅप इंस्टॉलेशनसाठी 512MB RAM आणि 4GB अंगभूत स्टोरेज देण्यात येत आहे. Kodak ने या TV वर YouTube, Prime Video, Sony Liv, Zee5 आणि इतर अनेक अॅप्स प्री-इंस्टॉल करण्यात येत आहेत. इतकेच नाही तर यात कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi, HDMI पोर्ट, USB पोर्ट आणि Miracast यांचा समावेश असणार आहे.