Smart TV offer : बाजारात अनेक स्मार्ट टीव्ही उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार खरेदी करू शकता. परंतु जर तुमचे बजेट कमी असेल आणि प्रीमियम लुक असणारा बेझल-लेस टीव्ही खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे.
तुम्ही आता Amazon सेलमध्ये उत्तम फीचर्स असणारा टीव्ही खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्ही सर्वात लोकप्रिय स्मार्ट टीव्ही कंपन्यांचे टीव्ही अवघ्या 5199 रुपयांना खरेदी करू शकता. लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.
Haier 81cm (32inches) Frameless Series HDReady Smart LED Android TV LE32W400G
हा टीव्ही 35% डिस्काउंटसह सेलमध्ये उपलब्ध असून सवलतीमुळे टीव्हीची किंमत 19990 रुपयांच्या MRP वरून 12,990 रुपये झाली आहे. या टीव्हीवर 2570 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस मिळेल. हा टीव्ही 630 रुपयांच्या EMI वर तुमचा असेल. कंपनी या टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ, सराउंड साउंड, एचडीआर 10 आणि गुगल असिस्टंट सारखे फीचर्स मिळतील आणि हा टीव्ही Google TV OS वर काम करतो.
VW 32 इंच फ्रेमलेस सीरीज HD रेडी अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्ही VW32S ऑफर
डिस्काउंटबद्दल बोलायचे झाले तर कंपनीचा हा टीव्ही 58% डिस्काउंटसह सेलमध्ये खरेदी करता येईल. या टीव्हीची MRP 16,999 रुपये इतकी आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल दरम्यान, तुम्हाला 7,199 रुपयांमध्ये सूट देऊन खरेदी करता येईल.
या बँक ऑफरमध्ये टीव्हीची किंमत आणखी 2,000 रुपयांनी कमी करता येईल. अशा बँक ऑफरमध्ये, हा टीव्ही 5,199 रुपयांमध्ये तुम्हाला खरेदी करता येईल. तसेच हा टीव्ही 2570 रुपयांच्या एक्सचेंज बोनससह खरेदी करू शकता. हा टीव्ही Android TV OS वर काम करेल.
TCL 32 इंच बेझल-लेस एस सीरीज HD रेडी स्मार्ट Android LED TV 32S5400A ऑफर
किमतीचा विचार केला तर Amazon च्या सेलमध्ये 52% डिस्काउंटनंतर टीव्हीची किंमत 9,990 रुपये इतकी झाली आहे. या टीव्हीवर 2 हजार रुपयांपर्यंत बँक सवलत मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये टीव्हीवर 2570 रुपयांचा फायदा होईल.
या टीव्हीच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर या TV मध्ये तुम्हाला 24 वॉट आउटपुट सह डॉल्बी ऑडिओ मिळणार आहे. AI Picture Engine 2.0 या टीव्हीच्या पिक्चर क्वालिटीमध्ये सुधारणा होते. या टीव्हीमध्ये नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि डिस्ने हॉटस्टार मिळेल.