ताज्या बातम्या

Smartphone Tips : स्मार्टफोन वापरताना तुम्हीही करताय का ‘ही’ चूक? होऊ शकतो तुरुंगवास, जाणून घ्या सविस्तर

Smartphone Tips : सगळेजण स्मार्टफोन (Smartphone) वापरताना दिसत आहेत. त्यामुळे कामे अगदी सहज होतात. स्मार्टफोनमुळे जग मुठीत आले आहे असे म्हणायला काहीच हरकत नाही.

परंतु, स्मार्टफोन वापरत (Smartphone use) असताना काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. कारण तुम्ही जर या चुका केल्या तर परिणामी तुम्हाला तुरुंगात (Jail) जावे लागेल.

स्मार्टफोन वापरताना त्यावर कधीही असंवेदनशील क्रियाकलाप करू नका. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर कोणत्याही प्रकारची असंवेदनशील कृती करत असल्यास तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तुमच्या स्मार्टफोनवर बॉम्ब, गनपावडर किंवा शस्त्रांशी संबंधित वस्तू कधीही शोधू नका. असे केल्याने तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या (Security systems) रडारखाली येऊ शकता आणि तुम्हाला तुरुंगात टाकले जाऊ शकते.

तुमच्या स्मार्टफोनवर कोणाचा खाजगी फोटो किंवा व्हिडिओ त्यांच्या परवानगीशिवाय कधीही लीक करू नका. तुम्ही सोशल मीडियावर (Social media) किंवा इतर कोणत्याही ठिकाणी परवानगीशिवाय एखाद्याचा फोटो आणि व्हिडिओ लीक केल्यास तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. हा सायबर गुन्हा आहे.

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनने कधीही कोणाच्याही धार्मिक (Religious) आणि जातीय भावना दुखावू नका. याशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला कधीही आक्षेपार्ह संदेश पाठवू नका. हा कायद्याने गुन्हा आहे. असे केल्याने तुरुंगात जाऊ शकते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts