Mobile Phone Tips : आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांकडे स्मार्टफोन आहेत. अनेकांकडे वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन आहेत. प्रत्येक स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत वेगळी आहे. मात्र स्मार्टफोन वापरताना काही चुका केल्या जातात त्याने स्मार्टफोन लवकरच खराब होतो.
स्मार्टफोनमुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून एकमेकांशी संवाद साधने सोपे झाले आहे. तसेच मुलांना स्मार्टफोनद्वारे शिक्षण घेणे देखील सहज शक्य झाले आहे. स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
लहान मुलांनादेखील स्मार्टफोनचे व्यसन लागले आहे. मात्र रोजच्या जीवनात स्मार्टफोन वापरताना नका चुका केल्या जातात. त्या चुका लवकर लक्षात आल्या नाहीत तर तुमचा स्मार्टफोन वेळेआधीच बंद पडू शकतो.
चुकूनही करू नका या 5 चुका
1. तुम्हाला तुमचा फोन साफ करायचा असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही फोन स्वच्छ करण्यासाठी काहीही वापरत असाल तर तसे करू नका. फोन साफ करण्यासाठी योग्य साधने वापरा. यामुळे फोन खराब होण्यापासून वाचेल.
2. स्मार्टफोनमध्ये तुम्ही वापरता तेवढे अॅप्स असावेत. जास्त अॅप्स डाउनलोड करू नका. याचा तुमच्या फोनच्या बॅटरीवर खूप वाईट परिणाम होतो आणि यामुळे फोन गरम होऊ लागतो, ज्यामुळे स्फोट होण्याची भीतीही असते.
3. फोन स्वच्छ करण्यासाठी वॉटर बेस्ड क्लिनर वापरू नका. याद्वारे फोन साफ केल्यास अंतर्गत भाग खराब होऊ शकतात.
4. फोनमध्ये एकापेक्षा जास्त पोर्ट आहेत जे अत्यंत काळजीपूर्वक वापरले पाहिजेत. तुमच्या फोनमध्ये कोणत्याही प्रकारची घाण साचत असेल तर ती स्वतः साफ करू नका. फक्त फोन क्लिनर प्रोफेशनलकडून ते स्वच्छ करा.
5. स्मार्टफोनचा सतत वापर करू नका. याचा फोनच्या मदर बोर्डवर वाईट परिणाम होतो. मधूनमधून फोन वापरणे चांगले. दरम्यान त्याची स्क्रीन बंद केल्याची खात्री करा. याचा फोनच्या मदर बोर्डवर वाईट परिणाम होत नाही आणि त्याचे आवश्यक भाग खराब होऊ शकत नाहीत.