Urban Pro Z : सध्याच्या काळात अनेकजण स्मार्टवॉच खरेदी करत आहेत. मार्केटमध्येही जबरदस्त फीचर्स असणारे स्मार्टवॉच लाँच होत असतात. जर तुम्ही कमी किमतीत उत्तम फीचर्स असणारे वॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण मार्केटमध्ये Urban Pro Z हे स्मार्टवॉच लाँच झाले आहे. ज्याची किंमत 2,999 रुपये इतकी आहे.हे 3 कलरमध्ये उपलब्ध असून ते तुम्ही वेबसाइटशिवाय Amazon India आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.
जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
या स्मार्ट वॉच मध्ये कंपनीने 1.85-इंचाचा फुल एचडी टच डिस्प्ले दिला आहे. तसेच 100 पेक्षा जास्त वॉच फेस दिले आहेत, जे वापरकर्त्यांना त्यांच्या मूड आणि स्टाइलनुसार सेट करता येतात. स्क्वेअर डायल वॉचची रचना असून ते झिंक मिश्र धातुपासून बनवले जाते.
या घड्याळाच्या डायलला जोडलेला सिलिकॉनचा पट्टा खूप मऊ आहे. त्याचबरोबर कंपनीने या वॉचमध्ये 24×7 हेल्थ मॉनिटरिंगसाठी ड्युअल सेन्सर दिला आहे. या वॉचमध्ये तुम्हाला 120 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड पाहायला मिळतील.
यामध्ये कंपनी तुम्हाला स्लीप आणि हार्ट रेट सेन्सर देत आहे. हे वॉच वापरण्यासाठी, तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर अर्बन हेल्थ सूट नावाचे अॅप इन्स्टॉल करावे लागेल. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचे आरोग्य आणि इतर अॅक्टिव्हिटीचा सहज आढावा घेऊ शकाल.
हे वॉच इन-बिल्ट एचडी स्पीकर आणि मायक्रोफोनने सुसज्ज असल्यामुळे आता वापरकर्त्यांना त्यामध्येच कॉल करता येईल. तर कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.0 दिला आहे. वॉचमध्ये उपस्थित असलेला AI व्हॉईस असिस्टंट तुम्हाला टेक्स्ट मेसेज आणि कॉल्सची माहिती देतो. हे वॉच IPX67 प्रमाणपत्रासह येते, ज्यामुळे घाम आणि पाण्यापासून संरक्षण होते.