Snake Interesting Facts: साप किती वर्ष जिवंत राहतात? कोणत्या जातीचा साप किती वर्ष जगतो? वाचा माहिती

Snake Interesting Facts:- सापाबद्दल आपल्याला माहीत असलेल्या गोष्टी पाहिल्या तर यामध्ये प्रामुख्याने अगोदर डोळ्यासमोर येते तो सापाने केलेला दंश आणि त्यामुळे होणारे मृत्यू व याच कारणामुळे सापाबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भीती असते.

या भीतीमुळे आपल्याला नुसता साप डोळ्यांना जरी दिसला तरी आपण सैरावैरा धावायला लागतो. जगाच्या पाठीवर सापांच्या साडेतीन हजार पेक्षा जास्त प्रजाती असून त्यापैकी काही जाती विषारी आहेत हे देखील आपल्याला माहिती आहे. भारताच्या दृष्टिकोनातून पाहिले तर भारतामध्ये ज्या काही सापांच्या प्रजाती आढळून येतात

त्यामध्ये चार ते पाच जाती या विषारी असल्याचे आढळून येते. या व्यतिरिक्त जर आपण पाहिले तर सापांविषयी अनेक महत्त्वाच्या अशा गोष्टी आहेत की जे आपल्याला अजून देखील पुरेशा प्रमाणात माहिती नाहीत. यातीलच महत्वाची गोष्ट पाहिली तर सर्वसाधारणपणे बऱ्याच जणांच्या मनामध्ये येत असेल की साप किती वर्षे जगतात किंवा जिवंत राहू शकतात. याविषयी जर माहिती घेतली तर सापांच्या जातीनिहाय त्यांचे जीवनमानाचा कालावधी हा वेगवेगळा आहे. नेमके साप किती वर्षे जिवंत राहू शकतात? याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.

 साप साधारणपणे किती वर्षे जगतात?

जर आपण सापांच्या संपूर्ण जीवन चक्राची माहिती घेतली तर ते प्रामुख्याने तीन टप्प्यांमध्ये विभागले गेलेले आहे. यातील पहिला टप्पा पाहिला तर मादी सापाने घातलेली अंडी याचा यामध्ये समावेश होतो. साधारणपणे एक मादी साप एका वेळेला दहा ते पंधरा अंडी घालते अंड्यातून सापाचे पिल्ले बाहेर येईपर्यंत त्याचे संरक्षण करण्याचे काम मादी साप करत असते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे सापांच्या काही प्रजाती अशा आहेत की त्या अंडी न घालता थेट पिल्लांना जन्म देतात. सर्वसाधारणपणे असे म्हटले जाते की 50 ते 55 दिवसाच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर सापाची पिल्ले अंड्यांमधून बाहेर येतात. तर काही प्रजातींची पिल्ले ही 40 दिवसांमध्ये अंड्यातून बाहेर येतात.

साप वर्षातून कमीत कमी दोनदा पिल्लांना जन्म देतात. जर आपण सापांचा प्रौढ होण्याचा कालावधी पाहिला तर तो प्रजातीनुसार वेगवेगळा आहे. काही सापाच्या प्रजाती दोन वर्षात तर काही चार वर्षांमध्ये प्रौढ होतात. सापांच्या वयाचा विचार केला तर तो प्रजातींवर अवलंबून असतो.

यांचे संपूर्ण आयुष्यकाल पाहिला तर त्यावर अनुवंशिकता तसेच आहार व पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडत असतो. सरासरी सापांच्या बहुतेक प्रजातींचे वय हे आठ ते दहा वर्षे इतके असते. परंतु यातील मोठा अजगर ही प्रजात सर्वात जास्त काळ जिवंत राहते व त्याचे वय सुमारे 40 वर्षापर्यंत असू शकते.

विशेष म्हणजे हा साप जगातील सर्वात लांब सापांपैकी एक आहे. त्यातीलच किंग कोब्रा नावाच्या सापाच्या प्रजातीची माहिती घेतली तर तो  विषारी वर्गातला साप आहेच व त्यालाच आपण नाग असे देखील म्हणतो. साधारणपणे 25 ते 30 वर्षापर्यंत जगतो. परंतु या जातीचा साप जर प्राणी संग्रहालयामध्ये असेल तर त्याचे वय 35 ते 40 वर्षापर्यंत देखील असण्याची शक्यता असते. तसेच क्रेट जातीचा साप हा दहा ते पंधरा वर्षे जगतो.

 सापाच्या साधारण किती जाती विषारी आहेत?

जगात 3789 सापाच्या प्रजाती आढळून येतात. म्हणजे त्यामध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे देखील  म्हटले जाते. याबाबत शास्त्रज्ञांचे मत पाहिले तर सापांच्या एकूण प्रजातीपैकी केवळ 600 प्रजाती विषारी असून बहूसंख्य प्रजाती या बिनविषारी वर्गातील आहेत.

सर्व प्रजातीपैकी 70 प्रजाती या समुद्रामध्ये राहतात म्हणजे ते समुद्री सर्प म्हणून ओळखले जातात. या प्रकाराचे साप जमिनीवर जगू शकत नाही. परंतु क्रेट जातीचा जो काही साप आहे तो पाण्यात देखील राहतो व जमिनीवर देखील राहू शकतो म्हणजे तो जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी चांगल्या पद्धतीने जगू शकतो.

Ajay Patil

Recent Posts