Snake Rearing : आश्चर्यम! ‘या’ गावात गाई-म्हशी नाही तर सापांचे केले जाते पालन, साप पालनातून गावकरी करतात लाखोंची कमाई

Snake Rearing : आपल्याकडे एक म्हण आहे की चिनी (China) वस्तूंचा काही भरवसा नसतो चलेंगे तो चांद तक नही तो शाम तक. आता चिनी लोकांचा देखील काही भरवसा राहिलेला नाही. चिनी लोक काय करतील याचा काही नेम नाही.

मीडिया रिपोर्टनुसार चीनमधील एका गावात आता चक्क सापांची शेती (Snake Farming In China) केली जात आहे. म्हणजे या गावातील लोक गाई म्हशी नाहीतर सापांचे पालन (Viral News) करतात आणि आपला उदरनिर्वाह भागवतात.

यामुळे सध्या चीन देशातील हे गाव चांगल्याच चर्चेत आले आहे. शेतकरी बांधव (Farmer) फळे, फुले, भाजीपाला, तृणधान्ये आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीसोबत (Farming) पशुपालन (Animal Husbandry) करतात, परंतु आधुनिक काळात जगाची मागणी पूर्ण करण्यासाठी विचित्र शेती (Agriculture) करण्याचा ट्रेंड वाढू लागला आहे.

यामध्ये साप पालनाचा देखील समावेश होतो. आपल्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की चीनच्या झेजियांग प्रांतातील झिसिकियाओ गावात लोक साप पाळून आपला उदरनिर्वाह करत आहेत. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, या गावातील सापांना अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, जर्मनी यांसारख्या देशांमध्ये मोठी मागणी आहे.

सापांचे पालन 1980 पासून सुरु 

भारतात, सापांना जैवविविधता तसेच धार्मिक महत्त्व आहे, परंतु जगातील सर्वात धोकादायक आणि प्राणघातक प्राण्यांमध्ये सापांची गणना प्रथम केली जाते. सापांचा एकच दंश माणसाला स्वर्गात पाठवू शकतो, परंतु चीनच्या झेजियांग प्रांतात असलेल्या जिक्सिकिओ गावात 3 दशलक्षाहून अधिक साप पाळले जात आहेत किंवा सर्पपालन केले जात आहे, ज्यातून या गावातील लोक काही पैसे कमावतात आणि स्वतःचा व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. चीनमध्ये साप पाळण्याची खूप जुनी परंपरा आहे. विशेषतः जिसिकियाओ गावात 1980 पासून शेतीऐवजी साप पालनाचा व्यवसाय केला जात आहे.

100 हून अधिक सापांचे फार्म

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिसिकियाओ गावात 100 हून अधिक सर्प फार्म आहेत, जिथे कोब्रा, अजगर, वाइपर, रॅटल्स सारख्या 3 दशलक्ष बिनविषारी सापांची लागवड केली जाते.  या गावातील 1000 हून अधिक लोक आता सापशेतीतून आपला उदरनिर्वाह करतात.

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लोक सापांचे पालन करतातच, पण सापांची पैदासही करतात. सापपालनासाठी लहान काचेच्या किंवा लाकडी पेटीत सापांची पिल्ले पाळली जातात. हिवाळ्यात, सापाच्या अंड्यांमधून साप बाहेर पडतात आणि काही काळानंतर ते प्रौढ होतात, त्यानंतर ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केले जातात आणि अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, जर्मनी यांसारख्या देशांमध्ये विकले जातात.

सापाचा उपयोग काय?

जिथे सापाला पाहून लोक थरथर कापायला लागतात तिथे चीनमध्ये त्याच सापाचे पालन करून लोक चांगली कमाई करत आहेत, हे आश्चर्यकारक आहे. रिपोर्ट्सनुसार, चीनच्या झेजियांग प्रांतातील जिक्सिकिओ गावात सापांचे विविध भाग बाजारात चढ्या किमतीत विकले जातात, ज्यामुळे चिनी लोकांना मोठा पैसा मिळतो.

या गावात सापांचा कत्तलखानाही आहे. येथे सापपालनाचा व्यवसाय इतका प्रगतीपथावर आहे की, लोकांनी शेती सोडून या कामात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कॅन्सरचे औषध किंवा केमो हे सापाच्या विषापासून बनवले जाते, ज्यामुळे कर्करोगाचे विष वितळते. याशिवाय चीनमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या आणि आजारांवर उपचार करण्यासाठी सापाच्या विषाचा वापर केला जातो.

चिनी लोक सापांचे पालन करतात पण या सापाला घाबरतात 

चीनमध्ये सापपालनाची विशेष परंपरा असली, तरी या कामात खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण सर्पदंशामुळे माणसाचा मृत्यू होतो. असाच एक विषारी आणि धोकादायक साप म्हणजे फाइव्ह स्टेप, ज्याच्यामुळे आजही झेजियांग प्रांतातील झिसिकिओ गाव, चीन, आणि जगातील सर्व देश खूप घाबरले आहेत.

वास्तविक, या सापाबाबत अनेक समजुती आहेत की, फाइव्ह स्टेप साप चावल्यानंतर पाच पावले चालल्यानंतर माणूस मरण पावतो. अशा धोक्यात चीनच्या झेजियांग प्रांतातील जिकियाओ गावात सापपालनाचे काम धोकादायक आणि अद्भुत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts