ताज्या बातम्या

तर.. मी स्वत: राणांच्या घरी जाऊन त्यांना बाहेर काढणार, बघू कोण मर्द येतोय

मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चालिसा पठण करणार असा निर्धार केला होता, मात्र आता राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उद्याच्या मुंबई दौऱ्यामुळे माघार घेतली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सध्या राणा यांच्या घरी पोलीस (Police) आल्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा (High Voltage Drama) झाला असून त्यावर केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी पत्रकार परिषदमध्ये (press conference) सवाल केले आहेत.

नारायण राणे म्हणाले, पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं. त्यांना जर अडवलं तर त्यांना घरातून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मी स्वत: राणांच्या घरी जाईल. बघू कोण येतो. मर्द आहेत ना? या तिकडे. त्या आधी पोलिसांनी त्यांना सुरक्षित बाहेर काढावं. काय घाबरट आहेत शिवसैनिक, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर (shivsena) हल्लाबोल केला आहे.

तसेच राणा दाम्पत्यांविरोधात केस घेण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. केस घ्या म्हणून सांगत होते. कशाची केस? काय केलं त्यांनी? एक खासदार आणि आमदार त्यांच्या जीविताला काही झालं मुंबईत तर राज्य सरकार जबाबदार असेल. बघतो किती वाजेपर्यंत जाऊ देत नाही. आता राणांना फोन करतो. तुम्हाला मदत हवी असेल तर मी येतो म्हणून सांगतो, असेही नारायण राणे म्हणाले आहेत.

त्याचसोबत, सरकारी पक्षच मुंबईतलं वातावरण बिघडवू पाहत आहे. या सर्वांना राऊत, परब जे कोण आहेत त्यांना मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा आहे की नाही याचं भान आहे? सत्ता असतानाही ते चॅलेंज देत आहेत.

संजय राऊत तर थेट स्मशानात पोहोचवण्याची भाषा करत आहेत. हा गुन्हा नाही का? या धमक्या सुरू असताना राज्यात पोलीस आहे की नाही याचा मला शंका आहे. माफी नाही मागितली तर घरातून बाहेर पडू देणार नाही हा गुन्हा नाही? काय करत आहेत पोलीस? असा सवालही राणेंनी उपस्थित केला आहे.

Renuka Pawar

Recent Posts