…म्हणून शिवसेनेने भावना गवळी यांची प्रतोद पदावरुन केली उचलबांगडी

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राज्याच्या विधीमंडळाला देखील मोठा धोका बसला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी केली आहे.

शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका उचलून धरली होती. त्यानंतर शिवसेनेचे १२ खासदार फुटणार असल्याची चर्चा सातत्याने रंगली. यामध्ये भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोद पदावरून हटवले आहे. भावना गवळी यांच्या जागी ठाण्यातील शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts