शिर्डीतील ‘त्या’ तलावावर उभारला जाणार सोलर पॅनल प्रकल्प

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :-   शिर्डी नगरपंचायत मालकीच्या कनकुरी रोडलगत असलेल्या सुमारे 40 एकर जागेवर 580 दशलक्ष लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावावर 1 हजार 494 सोलर पँनल प्रकल्प बसवून त्यामधून जास्तीत जास्त 0.5 मेगावँट वीजनिर्मिती होणार आहे.

यामुळे शिर्डी नगरपंचायतचे दरमहा पावणेचार लाख रुपयांची शंभर टक्के विजबिलाची बचत होणार असून अशाप्रकारचा साठवण तलावावर सोलर पँनलद्वारे वीजनिर्मितीसाठी शिर्डी नगरपंचायतचा

जिल्ह्यातील पहिला एकमेव प्रकल्प असल्याची माहिती शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिली. दरम्यान शिर्डीमध्ये सुरु होत असलेल्या या प्रकल्पामुळे विजेचा काहीसा प्रश्न सुटण्यास हातभार लाभणार आहे.

तसेच भविष्यातही हा वीजनिर्मिती प्रकल्प शिर्डीकरांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts