Solar Subsidy : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. अशातच घरगुती वीजबिलाचे दर देखील वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. मात्र तुम्ही देखील आता वीजबिलाला बाय-बाय करू शकता.
केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी पंतप्रधान सूर्य घर योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत देशातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनल बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांची वीजबिलापासून सुटका होणार आहे.
देशातील एक कोटी घरांवर रुफटॉप सोलर पॅनल बसवल्यानंतर दरमहा या कुटुंबाना 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. सध्या या योजने अंतर्गत घरांच्या छतावर सौर पॅनेल बसवण्याचे काम सुरु आहे. या योजनेसाठी तुम्ही देखील अर्ज करू शकता.
एक कोटी घरांना यामधून 300 युनिट मोफत वीज दिली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तसेच या योजनेच्या वेबसाइटची लिंकही शेअर करण्यात आली आहे. सरकारकडून नागरिकांना या योजनेवर सबसिडी देखील दिली जात आहे.
पीएम सूर्य घर योजनेच्या वेबसाइटवर तुम्हाला तुमचा वापर आणि किती किलो सोलर पॅनल्स लावायचे आहेत हे सांगायचे आहे. यानंतर हे सौर पॅनल बसवण्यासाठी तुमच्या खिशातून पैसे खर्च करायचे आहेत.
तुम्ही 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकत असाल आणि तुम्हाला दोन किलोवॅटचा सोलर पॅनल बसवायचा असेल, तर कॅल्क्युलेटरनुसार एकूण 86 हजार रुपये खर्च येईल. यामधून तुम्हाला 50 हजार रुपये भरावे लागतील. केंद्र सरकारकडून तुम्हाला 36 हजार रुपयांपर्यंत सबसिडी दिली जाईल.