ताज्या बातम्या

Chanakya Niti : पत्नीपासून नेहमी लपवून ठेवाव्यात काही गोष्टी, नाहीतर… जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti : सध्याच्या काळातही आचार्य चाणक्य यांचे आचार आणि विचार खरे उतरताना आपल्याला दिसतात. आयुष्यात एखाद्या मनुष्याने कसे वागावे? त्याचे आपल्या मित्रासोबत कसे संबंध असावेत?

यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आपल्याला चाणक्य नितीमध्ये सापडतात किंवा पाहायला मिळतात. तसेच कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या करू नयेत हेदेखील त्यांनी सांगितले आहे.

1. कमजोरी

नेहमी पुरुषांनी आपली कमकुवत बाजू लपवून ठेवावी. नाहीतर तुमची पत्नी वेगवेगळ्या प्रसंगी तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन तिचे काम साध्य करू शकते.

2. कमाई

कधीच पतीने पत्नीला त्याच्या कमाईबद्दल पूर्णपणे माहिती देणे टाळावे. समजा पतीच्या खऱ्या कमाईची माहिती घेतल्यानंतर पत्नी त्या कमाईला स्वतःची कमाई समजते आणि सतत पतीला खर्च करण्यापासून रोखते.

3. दान

दान नेहमी गुप्तपणे केले पाहिजे, असे आचार्य चाणक्य नेहमी सांगतात. त्यामुळे तुम्ही कुठे आणि किती दान केले हे कधीच तुमच्या पत्नीला समजू देऊ नये. तसेच जर तुम्ही उघडपणे दान केले तर त्या दानाची किंमत राहत नाही.

4. अपमान

पत्नीला कधीच आपल्या अपमान झाल्याचे सांगू नये. कारण जगातील कोणतीही पत्नी आपल्या पतीचा अपमान सहन करत नाही. त्यामुळे वाद शांत होण्याऐवजी वाढू शकतो.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts