ताज्या बातम्या

Sonali Phogat : धक्कादायक! ‘या’ कारणामुळे सोनाली फोगट यांचा मृत्यू झाला, दोन तास ठेवले होते शौचालयात

Sonali Phogat : भाजप (BJP) नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्या प्रकरणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. एक पार्टीदरम्यान त्यांच्याच सहकाऱ्यांनी सोनाली यांच्या पेयामध्ये ड्रग्स (Drugs) मिसळले होते.

त्याच्या सेवनामुळे त्यांचा मृत्यू (Sonali Phogat Death) झाला असावा, असा दावा गोवा पोलिसांनी (Goa Police) केला आहे. त्याचबरोबर, सोनाली यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दोन तास शौचालयात कोंडून ठेवले असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या पुढील तपासात अजून अनेक खुलासे व्हायचे आहेत. दरम्यान, भाजपच्या झेंड्यात गुंडाळलेल्या सोनालीच्या पार्थिवावर हिसारमध्ये शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पार्थिवाला खांदा आणि मुखाग्नि कन्या यशोधरा हिने दिला.

22 ऑगस्ट रोजी कर्लीज क्लबमध्ये (Curlies Club) एका पार्टीदरम्यान (Party) केक कापण्यात आल्याचा खुलासा गोवा पोलिसांनी केला आहे. या वेळी सोनाली फोगट, पीए सुधीर सांगवान (Sudhir Sangwan) आणि सुखविंद्र यांच्याशिवाय दोन मुली उपस्थित होत्या.

नंतर पार्टीदरम्यान सुधीर सांगवान आणि सुखविंदर सोनालीला सिंथेटिक ड्रग्स पिण्यास भाग पाडतात. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे.

पैशाच्या व्यवहाराचे कारण

गोवा पोलिसांचे आयजी नॉर्थ ओमवीर सिंग बिश्नोई यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपी सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांनी सोनाली फोगटला पैशाच्या व्यवहाराच्या कटाचा एक भाग म्हणून ड्रग्स दिल्याची कबुली दिली.

ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे सोनालीची प्रकृती बिघडली. सोनाली शुद्धीवर नसताना त्यांनी दुपारी साडेचारच्या सुमारास तिला पकडून शौचालयात नेले. तेथे त्यांनी सोनालीला दोन तास आत कोंडून ठेवले आणि त्यानंतर तिला हॉटेलमध्ये आणले.

टॅक्सी चालकाची चौकशी सुरू आहे.

ज्या टॅक्सी चालकाने सोनाली, सुधीर आणि सुखविंद्र यांना कर्लीज क्लबमधून हॉटेलमध्ये नेले होते. चालकाची ओळख पटली आहे. त्याचीही चौकशी सुरू आहे.

सोनालीला हॉटेलमधून रुग्णालयात नेणाऱ्या टॅक्सी चालकाचाही तपासात समावेश करण्यात येणार आहे. केक कापताना उपस्थित मुलींचीही चौकशी केली जाणार आहे. आरोपी जिथे जायचे, तिथे त्यांना पुन्हा नेले. आरोपींना रिमांडवर घेऊन चौकशी केली जाईल.

सोनालीला चालताही येत नव्हते, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होते

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनालीला चालताही येत नसल्याचे दिसत आहे. पीए सुधीर सांगवान तिला दोन्ही हातांनी धरून पायऱ्यांवरून वर नेताना दिसले.

त्यांच्या मागे आणखी दोन तरुण चालताना दिसत आहेत. जेव्हा तो सोनालीला पायऱ्यांवरून खोलीत घेऊन जातो तेव्हा ती पायऱ्यांवरच पडते. हे 24 सेकंदांचे सीसीटीव्ही फुटेज आहे.

सिंथेटिक ड्रग काय आहे.

सिंथेटिक ड्रग प्रयोगशाळेत तयार केली जातात. रेव्ह पार्टीमध्ये त्याची मागणी जास्त असते. त्यात कॅनाबिनॉइड्स नावाची रसायने असतात जी ग्रंथींना उत्तेजित करतात. त्याच्या अतिसेवनामुळे जीवालाही धोका निर्माण झाला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts