Sonali Phogat : भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूमुळे (Sonali Phogat Death) त्यांच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
अशातच सोनाली फोगाट यांचा भाऊ रिंकू यांनी सर्वात गंभीर आरोप (Accusation) केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
बुधवारी सोनाली फोगटची सासू गोमती देवी, जेठ कुलदीप, बहीण रेमन आणि रुकेश यांनी पत्रकार परिषद घेऊन सोनालीचे पीए सुधीर सांगवान (PA Sudhir Sangwan) यांच्यावर गंभीर आरोप केले.
त्यांनी सोनालीच्या मृत्यूसाठी सुधीरला जबाबदार धरले आणि या प्रकरणाची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली. सुधीरची नार्को टेस्ट करण्याची मागणीही त्यांनी केली. पोलीस कुटुंबाला मदत करत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.