Sony Bravia TV : तुम्ही अनेक कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही पाहत असाल. अनेक लोकप्रिय स्मार्ट टीव्ही निर्मात्या कंपन्या आपल्या शानदार फीचर्स असणारे टीव्ही लाँच करत असतात. Sony ही भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय स्मार्ट टीव्ही कंपनी आहे. या कंपनीच्या टीव्हीला बाजारात खूप मागणी आहे. कंपनी सतत आपले टीव्ही लाँच करत असते.
आता तुम्ही कंपनीचा 55-इंच XR 4K अल्ट्रा HD स्मार्ट OLED Google TV- 55A80J 51% सवलतीसह खरेदी करू शकता. महत्त्वाचे म्हणजे या टीव्हीची मूळ किंमत 2,49,900 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही प्राइम अर्ली डीलमध्ये हा टीव्ही 1,22,990 रुपयांमध्ये डिस्काउंटनंतर सहज खरेदी करू शकता. त्यामुळे तुम्ही हजारो रुपये वाचवू शकता. जाणून घ्या फीचर्स.
जाणून घ्या फीचर्स
या स्मार्ट टीव्हीच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर या Sony TV मध्ये तुम्हाला 3840×2160 पिक्सेल रिझोल्युशनसह 55 इंच 4K अल्ट्रा HD डिस्प्ले पाहायला मिळेल. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच यात पॉवरफुल साउंडसाठी, कंपनी 30 वॅट साउंड आउटपुट आणि अकोस्टिक सरफेस ऑडिओसह डॉल्बी अॅटमॉस देखील देत आहे.
तसेच या 55-इंचाच्या 4K सोनी टीव्हीची चित्र गुणवत्ता आणखी सुधारण्यासाठी, यामध्ये XR कॉग्निटिव्ह प्रोसेसर, XR मोशन क्लॅरिटी,4K HDR, XR OLED कॉन्ट्रास्ट बूस्टर आणि 4K 120 सारखी अतिरिक्त फीचर्स देण्यात आली आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या टीव्हीमध्ये तुम्हाला हँड्स-फ्री व्हॉईस सर्च, गुगल प्ले, क्रोमकास्ट, अलेक्सा आणि ऍपल एअर प्ले आणि ऍपल होमकिट यांचा सपोर्ट मिळेल. इतकेच नाही तर कनेक्टिव्हिटीसाठी कंपनीकडून या टीव्हीमध्ये 4HDMI पोर्ट, गेमिंग कन्सोल, ब्लू रे प्लेयर, आणि तीन यूएसबी पोर्ट सारखे पर्याय देण्यात येत आहे.