Special Fixed Deposit : प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतो. ही गुंतवणूक त्यांना संकटकाळी खूप कामी येते. सध्या अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत. तुम्ही खासगी किंवा सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता, महत्त्वाचे म्हणजे अनेकजण कोणतीही जोखीम नसणाऱ्या आणि जास्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करतात.
त्याशिवाय अनेकजण बँक एफडीमध्ये गुंतवणूक करतात. या ठिकाणीही गुंतवणूकदारांना उत्तम परतावा मिळतो. आयडीबीआय बँकेने आपल्या विशेष एफडी योजनेच्या म्हणजेच अमृत महोत्सव एफडीच्या गुंतवणुकीचा कालावधी वाढवला आहे.
या पूर्वी अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2023 होती परंतु आता ती 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी आणखी एक संधी उपलब्ध आहे. लगेचच याचा लाभ घ्या.
बँकेने दिली महत्त्वाची माहिती
हे समजून घ्या की अमृत महोत्सव FD मध्ये बँकेच्या गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त व्याजाचा लाभ देण्यात येत आहे. आता गुंतवणूकदार 31 ऑक्टोबरपर्यंत ही शानदार योजना खरेदी करू शकता. याबाबत IDBI ने आपल्या वेबसाइटवर माहिती दिली आहे. अमृत महोत्सव FD ची ऑफर 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत 375 दिवस आणि 444 दिवसांसाठी वाढवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
या लोकांना मिळेल सर्वात जास्त व्याज
तर त्याच वेळी, IDBI या बँकेने सांगितले आहे की नियमित NRE आणि NRO ग्राहकांना 444 दिवसांच्या अमृत महोत्सव एफडी योजनेवर 7.15 टक्के दराने व्याजाचा लाभ दिला जाईल. तर ज्येष्ठ नागरिकांना या एफडीवर 7.65 टक्के दराने व्याज व्याजाचा लाभ दिला जात आहे. इतकेच नाही तर या बँकेच्या ग्राहकांना लवकर पैसे काढण्याची आणि बंकिंगची सुविधा मिळत आहे.
375 दिवसांच्या कालावधीवर मिळेल इतके व्याज
375 दिवसांची विशेष एफडी असणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकांना 7.10 टक्के दराने व्याजाचा लाभ दिला जात आहे. तसेच या एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.60 टक्के दराने व्याज देण्यात येत आहे.