Ahmednagar News : अहमदनगर शहरातील उड्डाणपुलाचे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र, या पुलाला नाव कोणाचे द्यायचे, यावरून पूर्वीपासूनच वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
अशातच या पुलावर एक नामफलक लावण्यात आल्याचे दिसून आले. “श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणू पूल, प्रेरणा प्रतिष्ठान अहमदनगर” अशा नावाचा फलक पुलावर लावण्यात आला आहे.
फलकावर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज तर दुसऱ्या बाजूला शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे छायाचित्र आहे. या उड्डाणपुलासाठी विविध पक्षांनी, नेत्यांनी आणि गटांनी वेगवेगळी नावे सुचविलेली आहेत.
मात्र, अधिकृतपणे अद्याप कोणतेही नाव ठरलेले नाही. उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही महिन्यांत ते पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येते.
सध्या खासदार डॉ, सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच संकल्पनेतून पुलावर चित्रमय शिवचरित्रही साकारण्यात येत आहे.